Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply, Form PDF, Hamipatra PDF, Eligibility Criteria, Required Documents, Official Website

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply, Form PDF, Hamipatra PDF, Eligibility Criteria, Required Documents, Official Website

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply : महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली. राज्यातील महिलांच्या आर्थिक व आरोग्य परिस्थिती मध्ये सुधारणा तसेच पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” सुरु केली आहे.

शासनाने योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply भरण्याची प्रक्रिया सुरु केली आहे, महाराष्ट्र राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास महिलांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना 2024 काय आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी राज्य शासनाने जुलै 2024 मध्ये सुरु केली. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे, ऑनलाईन अर्ज करण्याची Eligibility Criteria पात्रता आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी ऑनलाईन Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply अर्ज कुठे करायचा याबद्दल सविस्तर माहिती येथे दिलेली आहे. या माहितीद्वारे आपल्याला योजनेचा लाभ घेण्यास नक्कीच मदत होणार आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply

राज्य शासनाने महिलांसाठी महत्वपूर्ण योजना सुरु केली आहे. या योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना असे आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील महिला उत्सुक आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply कसा करायचा यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचा. सदर योजनेचा शासन निर्णय २८ जून २०२४ रोजी काढण्यात होता, आता काही दिवसापूर्वी योजनेमध्ये नवीन बदल करण्यात आले असून त्यातील महत्वपूर्ण बदल म्हणजे २८ जून २०२४ च्या शासन निर्णयाप्रमाणे राज्यातील २१ ते ६० वयोगटातील महिलांना लाभ दिला जाणार होता परंतु आता यामध्ये बदल करून २१ ते ६५ या वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच त्या कुटुंबातील १ महिला व कुटुंबातील वय वर्षे २१ पुढील मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Eligibility Criteria

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी mukhyamantri majhi ladki bahin yojana eligibility criteria पात्रता खलीलप्रमाणे.

  • अर्जदार महिलेचे वय हे २१ ते ६० दरम्यान असावे.
  • कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न हे २ लाख ५० हजार पेक्षा अधिक नसावे.
  • कुटुंबातील कोणताही व्यक्ती आयकरदाता नसावा.
  • महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • सदर महिलेने जर शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे एक हजार पाचशे (१५००/-) पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • कुटुंबातील सदस्य विद्यमान माझी आमदार/खासदार असेल तर त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/कॉर्पोरेशन/अध्यक्ष/उपाध्यक्ष/सदस्य/संचालक असेल तर अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • कुटुंबातील सदस्याच्या नावावर ४ चाकी वाहन नावावर नसावे. (ट्रँक्टर सोडून)

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Required Documents

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • बँक खाते पासबुक (आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे)
  • रेशन कार्ड झेरॉक्स
  • उत्पन दाखला (आपल्याकडे उत्पन दाखला नसेल तर आपण पिवळे/केसरी रेशन कार्ड देऊ शकता)
  • अधिवास प्रमाणपत्र (आपल्याकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर आपण १५ वर्षापूर्वीचे १) रेशन कार्ड २) शाळा सोडल्याचा दाखला ३) मतदार ओळखपत्र ४) जन्म दाखला यापैकी कोणतेही १ देऊ शकता.
  • फॉर्म भरण्यासाठी मोबाईल नंबर आवश्यक आहे.
  • पासपोर्ट आकाराचा अर्जदाराचा फोटो.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Benefits

राज्य शासनाने राज्यात महिलांसाठी मुख्यमंत्री लाखी लाडकी बहिण योजना सुरु केली, योजनेमधून पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये हप्ता मिळणार आहेत. राज्य शासन हा हप्ता पात्र लाभार्थी महिलेच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये DBT मार्फत जमा करणार आहे. यासाठी बँक खात्याला लाभार्थी महिलेचे आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Website

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अजून वेबसाईट उपलब्ध झाली नाही. लाभार्थी महिलांना ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून मोबाईल अँपद्वारे अर्ज करता येणार आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply Process

अर्ज करण्यासाठी शासनाने नारीशक्तीदूत हे अँप उपलब्ध करून दिलें आहे. Narishakti Doot या अँपद्वारे अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम मोबाईल मध्ये Narishakti Doot हे अँप प्ले-स्टोअर वरून इंस्टाॅल करावे.

  • अँपमध्ये सर्वप्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी संपूर्ण नाव, ई-मेल आणि मोबाईल नंबर इ. असणे आवश्यक आहे.
  • अँप सुरु केल्यानंतर सर्वप्रथम मोबाईल नंबर टाकावा, त्यानंतर दिलेल्या मोबाईलनंबर वरती एक सहा अंकी ओटीपी येईल तो ओटीपी टाकून व्हेरीफाय करा. त्यानंतर आपण अँपमध्ये लॉग इन व्हाल.
  • लॉग इन झाल्यानंतर सर्व प्रथम प्रोफाईल अपडेट करण्यासाठी ऑप्शन येईल. आपली प्रोफाईल अपडेट करून घ्यावी, प्रोफाईल अपडेट करताना नारीशक्ती प्रकार बरोबर निवडावा.
  • प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर आपल्याला अर्ज करण्यासाठी पर्याय उपलब्ध होईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना खालील प्रमाणे पर्याय दिसेल.
majhi ladki bahin yojana gov in
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर एक फॉर्म ओपन होईल हा फॉर्म तुम्हाला व्यवस्थित भरून कागदपत्रे अपलोड करावी.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Hamipatra PDF

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरण्यासाठी लाभार्थ्याने योजनेचे हमीपत्र देणे गरजेचे आहे. Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply फॉर्म भरताना कागदपत्रासोबत हमीपत्र देणे आवश्यक आहे. हमीपत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

  • आपल्यासमोर एक फॉर्म ओपन होईल.
  • फॉर्म सोबत हमीपत्र जोडलेले आहे, हमीपत्र डाऊनलोड करण्यासाठी फॉर्मच्या वरती एक बाणाचे चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करावे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे हमीपत्र PDF आपल्या मोबाईल मध्ये ओपन होईल.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Form PDF

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना योजनेसाठी अर्जदार ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात. नारीशक्ती दुत अँपमधून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना फॉर्म डाऊनलोड करून घ्यावा. फॉर्म व्यवस्थित भरून आवश्यक कागदपत्रे फॉर्मसोबत जोडावी. तसेच फॉर्म बरोबर हमीपत्र जोडणे आवश्यक आहे. संपूर्ण फॉर्म भरून कागदपत्रे जोडून संबधित कार्यालाम्ध्ये फॉर्म जमा करावा. फॉर्म डाऊनलोड करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी कोणत्या महिला पात्र आहेत?

महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील राज्यातील विवाह महिला, विधवा, परित्यक्त्या आणि निराधार महिला घटस्फोटीत महिला इ. महिलांना योजनेचा लाभ मिळू शकतो, त्याच बरोबर कुटुंबातील अविवाहित मुलीला या योजनेचा लाभ मिळू शकतो. कुटुंबातील एका महिलेला त्याबरोबर एका अविवाहित मुलीला योजनेचा लाभ मिळेल.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *