PAN Card Online; मोबाईलवरून पॅन कार्ड डाउनलोड करा

PAN Card Online

PAN Card Online : पॅन कार्ड हे बँकिंग क्षेत्रात खूपच महत्वाचे कागदपत्रे आहे, आपल्याला जर ५०००० रु पुढील व्यवहार करायचा असेल तर पॅन कार्ड असणे गरजेचे आहे.”PAN Card Online

PAN Card Online

काही वेळेस आपले पॅन कार्ड हरवते अशा वेळेस नवीन पॅन कार्ड पोस्टाने येण्यासाठी एक-दोन महिने जातात पण आपल्याकडे जर डिजिटल (PAN Card Online) पॅन कार्ड ची कॉपी असेल तर तीसुद्धा कामासाठी चालते. आम्ही याठिकाणी डिजिटल पॅन कार्ड डाउनलोड कसे करणार याची संपूर्ण प्रोसेस दिलेली आहे. डिजिटल पॅन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी आपल्याकडे पॅन कार्डचा नंबर असणे गरजेचे आहे.

पॅन कार्डचे अनेक फायदे आहेत.

  • बँकेमध्ये नवीन खाते उघडायचे असेल तर पॅन कार्ड असणे गरजेचे आहे.
  • कोणतेही कर्ज घेण्यासाठी पॅन कार्ड लागते.
  • पॅन कार्ड नसेल तर तुम्हाला कोणतीही बँक कर्ज देणार नाही.
  • पॅन कार्ड कार्ड असेल तर सिबिल स्कोर “CIBIL SCORE” चेक करू शकता.

पॅन कार्ड डाउनलोड कसे करावे?

सर्वप्रथम आपल्याकडे जर पॅन कार्ड असेल पॅन कार्डच्या मागच्या बाजूला तुम्हाला एक पत्ता दिसेल त्यामध्ये NSDL किंवा UTITSL या दोन्हीपैकी एका ऑफिसचा पत्ता दिसेल.

आपल्या पॅन कार्ड कार्डच्या मागच्या बाजूला जर NSDL ऑफिस चा पत्ता असेल तर तुम्हाला गुगल वरती nsdl pan download असे सर्च करावे. त्याठिकाणी तुम्हाला पहिलीच लिंक दिसेल https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html ओपन करावी.

  • खाली फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रथम तुमचा पॅन कार्ड कार्ड नंबर टाकावा लागेल. नंतर आधार कार्ड टाका.
  • जन्म तारीख महिना व वर्ष टाका खालील चौकोनात क्लिक करा व captcha कोड टाका.
pan card online
pan card online
  • SUBMIT वर क्लिक करावे लागेल,
  • पॅन कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओटीपी/OTP जाईल तो वेरीफाय करा.
  • आणि ८ रु २६ पैसे पेमेंट करा नंतर तुमचे पॅन कार्ड डाऊनलोड होईल.

UTITSL

  • जर तुमच्या पॅन कार्ड च्या मागच्या बाजूला UTITSL ऑफिसचा पत्ता असेल तर गुगल मध्ये uti pan download असे सर्च करावे लागेल.
  • त्यामध्ये https://www.pan.utiitsl.com/PAN_ONLINE/ePANCard हि साईट ओपन करावी.
UTITSL PAN CARD DOWNLOAD
UTITSL PAN CARD DOWNLOAD
  • प्रथम पॅन कार्ड नंबर टाकावा नंतर जन्मतारखेचा महिना व वर्ष टाका नंतर CAPTCHA कोड टाका आणि SUBMIT करा.
  • लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर सहा अंकी OTP/ओटीपी जाईल तो टाकून वेरीफाय करा.
  • नंतर ८ रु २६ पैसे पेमेंट करा पेमेंट झाल्यानंतर आपले PAN Card डाऊनलोड होईल.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *