PM Kisan योजना भौतिक तपासणी फॉर्म | PM Kisan Physical Verification Form
PM Kisan Physical Verification Form : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहात तर आपल्यासाठी महत्वपूर्ण माहिती.
PM Kisan योजनेमध्ये जे लाभार्थी शेतकरी आहेत, यामधील काही शेतकऱ्यांची भौतिक तपासणी (Physical Verification) होणार आहे.
भौतिक तपासणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे?
- आधारकार्ड छायांकित प्रत,
- बँक पासबुक छायांकित प्रत,
- ७/१२,
- ८ अ,
- रेशन कार्ड (Ration Card)
पीएम किसान योजनेमध्ये जे शेतकरी योजनेच्या लाभासाठी अपात्र आहेत, ते शोधण्यासाठी भौतिक तपासणी (Physical Verification) केली जाणार आहे. फक्त काही शेतकऱ्यांची “भौतिक तपासणी” होणार आहे. यामध्ये शेतकऱ्याला पीएम किसान भौतिक तपासणी अर्ज (PM Kisan Physical Verification Form) भरून त्यासाठी लागणारी कागदपत्रे जोडून अर्ज संबंधित अधिकारी यांच्याकडे द्यायचा आहे.
भौतिक तपासणी अर्ज PM Kisan Physical Verification >> येथे क्लिक करा.