कामगारांना मिळणार ३००० रु पेंशन | Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana

Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana

Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana : या योजनेमध्ये असंघटित कामगारांना प्रत्येक महिन्याला ३००० रुपये पेंशन दिली जाते.यासाठी काही अटी आहेत.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना ही एक सामाजिक सुरक्षेसाठी असलेली सरकारी योजना आहे.

असंघटीत कामगारांना वृद्धापकाळात योजनेचा नक्कीच फायदा होणार आहे. या लेखात आपण योजनेबद्दल माहिती,पात्रता काय असेल, कागदपत्रे इ. सविस्तर माहिती दिलेली आहे.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना काय आहे? | Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana

प्रधानमंत्री मानधन योजना ही असंघटित कामगारांसाठी योजना आहे. यामध्ये कामगाराचे वय १८ ते ४० दरम्यान असेल तर ते योजनेचा लाभ घेऊ शकतात.

लाभार्थीला योजेनेचा लाभ घेण्यासाठी काही प्रमाणात स्वं हिस्सा गुंतवणूक करावी लागते, तसेच काही प्रमाणात सरकार रक्कम भरते.

यासाठी लाभार्थीला वय वर्ष ६० पर्यंत वयानुसार ५५ ते २०० रुपयांपर्यंत लाभार्थी हिस्सा प्रति महिना योजनेमध्ये जमा करावा लागतो. ६० वर्षानंतर लाभार्थीला ३००० रुपये पेंशन दरमहा दिली जाते.

प्रधानमंत्री मानधन योजनेमध्ये कोणते व्यक्ती पात्र नाहीत?

  • जे कामगार (EPFO/ESIC/NPS) सदस्य असतील ते या योजनेच्या लाभासाठी पात्र नसतील. तसेच आयकर भरणारे योजनेस पात्र नसतील.

प्रधानमंत्री मानधन योजनेसाठी पात्रता काय असेल?

  • योजनेमध्ये असंघटित कामगार (UW) वय वर्षे १८ ते ४० दरम्यान.
  • कामगारांचे उत्पन्न १५००० रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे.

Pradhanmantri shram Yogi maandhan Yojana details.

योजनाप्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना.
मिळणारा लाभ६० वर्षानंतर दरमहा ३००० रू पेंशन.
अधिकृत वेबसाईटhttps://maandhan.in/shramyogi
योजनाकेंद्र शासन
PMSYM

कागदपत्रे/माहिती.

  • बँक पासबुक (IFSC कोड सहित) किंवा जनधन खाते, आधार कार्ड,मोबाईल क्रमांक.

Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana Online Registration

  • PMSYM योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती ऑनलाईन फॉर्म भरू शकता तसेच सीएससी किंवा ऑनलाईन केंद्रावरती जाऊन फॉर्म भरू शकता. नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला एक कार्ड सुद्धा मिळते.
  • योजनेमध्ये नामांकन सुविधा उपलब्ध आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *