रेशन कार्ड ऑनलाईन दुरुस्ती करता येणार पहा : Ration Card Correction Maharashtra
Ration Card Correction Maharashtra : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी, रेशन कार्ड आता घरबसल्या अपडेट करता येणार आहे, म्हणजेच आपण घरबसल्या रेशन कार्ड मध्ये दुरुस्ती करता येणार आहे.
Ration Card Correction Maharashtra
रेशन कार्ड हे महत्वाचे कागदपत्रे आहे, राज्य शासनाने आता रेशन कार्ड संबंधित विविध सेवा या ऑनलाईन सुरु केल्या आहेत. रेशन कार्ड मधील नाव दुरुस्ती करणे, रेशन कार्ड मध्ये नवीन नाव जोडणे, ऑनलाईन ई-शिधापत्रिका डाऊनलोड करणे, इतर कामे हि ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत.
रेशन कार्ड मधील काही दुरुस्ती करावयाची असल्यास नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये जावे लागणार नाही. या सुविधेमुळे नागरिकांना “Ration Card Correction Maharashtra” ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. तसेच त्यासाठी होणारा खर्च देखील कमी होईल.
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना अन्न पुरवठा विभागाच्या संकेस्थळावर नोंदणी करावी लागेल. पोर्टल वरती नोंदणी केल्यानंतर पुन्हा पोर्टल वरती लॉग इन करावे लागेल. त्यानंतर ऑनलाईन रेशन कार्डची माहिती पाहायला मिळेल, व त्यामध्ये काही दुरुस्ती करायची असल्यास त्याठिकाणी पेन्सिल आयकॉन असेल त्यावर क्लिक करून ती माहिती दुरुस्त करता येईल.
ration card update maharashtra
तुम्हाला जर डिजिटल रेशन कार्ड प्रिंट काढायची असेल तर डिजिटल रेशन कार्ड प्रिंट कशी काढायची माहितीसाठी येथे क्लिक करा. आणि जर तुम्हाला आपल्या गावाची रेशन कार्ड ची संपूर्ण यादी पहायची असेल तर या माहितीसाठी येथे क्लिक करा.
नागरिकांना दुरुस्ती करिता शासनाने अन्न नागरी पुरवठा विभागाच्या https://rcms.mahafood.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. नोंदणी करण्यासाठी Sign/Register या पर्यायवर क्लिक करावे लागेल. त्याठिकाणी Public Login हा पर्याय सिलेक्ट करा. आपल्याला नोंदणी करावयाची आहे म्हणून New User Sign Up Here हा पर्याय निवडा.
मोबाईल वरून सुद्धा दुरुस्तीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. किंवा जवळच्या ऑनलाईन सेवा केंद्र, कॉमन सर्विस सेंटर याठिकाणी जावून आपण अर्ज करू शकता.
Ration Card exist But aadhar card of HOF/NFSA head is not verified
Ration Card With provided Aadhaar details doesn’t exist!!
पब्लिक login ला असा प्रोब्लेम येतो.
रजिस्ट्रेशन करावे नंतर लॉग इन करावे.
“Ration card exist, but aadhar card of hof/nfsa head is not verified”
असा error येतो मला rcms पोर्टलवर लॉगिन केल्यावर.
ही आधार कार्डचा ईससुन आहे का ?
रजिस्ट्रेशन करावे नंतर लॉग इन करावे.
SAAHEB REGISTRATION KARTANACH TO ISSUE YETOY.