रेशन कार्ड प्रिंट काढा मोबाईलवरून : Online Ration Card Print
Online Ration Card Print : रेशन कार्ड ऑनलाईन प्रिंट आपण काही मिनिटातच काढू शकता. रेशन कार्ड प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला रेशन कार्डचा १२ अंकी नंबर माहिती असेलच जर तुम्हाला “Ration Card Print” रेशन कार्डचा १२ अंकी SRC Number माहिती नसेल तर (आधार कार्ड नंबर वरून रेशन कार्ड नंबर असा काढा) हा लेख वाचा.
Ration Card Online check
रेशन कार्डची प्रिंट काढण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा
- मोबाईल मध्ये किंवा कॉम्पुटर वरती https://rcms.mahafood.gov.in/ हि साईट ओपन करा.
- मोबाईलवरती क्रोम ब्रावझर वरती वरील साईट ओपन करावी.
- खालील प्रमाणे तुम्हाला स्क्रीन दिसेल.
- उजव्या बाजूला वरती तीन रेषा/डॉटवर क्लिक करा आणि Desktop site समोरील चौकोनात क्लिक करा म्हणजे जशी कॉम्पुटर वरती स्क्रीन असते तशी मोबाईल वरती दिसेल.
येथे पहा आधार कार्ड नंबर वरून रेशन कार्ड नंबर असा काढा
- खाली दाखवल्याप्रमाणे Ration Card वरती क्लिक करून “Know Your Ration Card” पर्याय निवडा.
- मोबाईलमध्ये एक नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये हिरव्या कलर मधील अक्षरे Captcha चौकोनात भरा आणि Verify बटन वरती क्लिक करा.
- पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये Ration Card No/Old Ration Card No समोरील चौकोनात आपला रेशन कार्डचा १२ अंकी SRC नंबर टाका.
- View Report वरती क्लिक करा. आपल्या समोर रेशन कार्डची माहिती ओपन होईल.
- निळ्या रंगातील Print Your Ration Card वर क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर खालील प्रमाणे डिजिटल रेशन कार्ड ओपन होईल.
येथे पहा आपल्या गावाची रेशन कार्ड यादी
अशा प्रकारे आपण रेशन कार्डची डिजिटल प्रिंट काही मिनिटातच मोबाईलवरून घरबसल्या काढू शकता.