500 रु नोटे संबंधित PIB ने दिली महत्वाची माहिती : 500 rupees note news
500 rupees note news : मागील काही दिवसापासून ५०० रुपयांच्या नोटा संदर्भात एक मेसेज सोशल मिडिया वरती वायरल होत आहे. त्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, ५०० रुपयाच्या नोट वरील म.गांधीजींच्या फोटो जवळ जर हिरव्या रंगाची पट्टी असेल तर ती नोट खोटी/नकली आहे, अशी नोट घेऊ नये. RBI गव्हर्नर यांच्या सहीजवळ हिरव्या रंगाची पट्टी असेल तर ती नोट खरी आहे असे वायरल मेसेजमध्ये सांगितले आहे.
काय आहे सत्य? RBI & PIB ने दिली स्पष्ट माहिती.
RBI गव्हर्नर यांच्या ५०० रुपयांच्या नोटेवरील हिरव्या पट्टी संदर्भात वायरल होणारा मेसेज हा खोटा आहे. म. गांधीजींच्या फोटो जवळ असणारी हिरव्या रंगाची पट्टी असणारी ५०० रुपयाची नोट चलनात वैध आहे. तसेच RBI गव्हर्नर यांच्या सही समोर हिरव्या रंगाची पट्टी असणारी नोटसुद्धा वैध आहे. दोन्ही नोटा चलनात वैध आहेत, यामुळे नागरिकांनी गोंधळून जावू नये.