50 रु मध्ये मिळवा स्मार्ट आधार कार्ड घरपोच : Aadhaar PVC Card

Aadhaar PVC Card

Aadhaar PVC Card : आधार कार्ड अत्यंत महत्वाचे कागदपत्र आहे. योजनांचा लाभ घेयचा असो, किंवा कोणताही ऑनलाईन फॉर्म भरायचा असो, अशावेळेस आपल्याला आधार कार्ड लागते. आधार कार्ड नसेल तर योजनांचा लाभसुद्धा घेता येत नाही.

Aadhaar PVC Card

आधार पीव्हीसी “Aadhaar PVC Card” कार्डचे खूप सारे फायदे आहेत. प्रत्येक आधारकार्ड धारक स्वतः मोबाईल वरून ऑनलाईन PVC आधार कार्ड मागवू शकतो. तेही घरबसल्या कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. हे आधार कार्ड मागविण्यासाठी ५० रु शुल्क ऑनलाईन भरावे लागते.

आधार पीव्हीसी कार्ड घरबसल्या कसे मिळवायचे?

मोबाईल वरून काही मिनिटातच आपण आधार पीव्हीसी (aadhaar pvc card order) ऑर्डर करू शकता. आधार कार्ड ऑर्डर केल्यानंतर १ महिन्यात तुम्हाला घरपोच मिळेल. तसेच याचे स्टेटस सुद्धा चेक करू शकता.

PVC आधार कार्ड ऑर्डर करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

  • मोबाईल मध्ये UIDAI ची अधिकृत वेबसाईट ओपन करावी.
  • प्रथम आपली भाषा निवडावी लागेल. आपण कोणतीही भाषा निवडू शकता.
  • आपण मोबाईल वरून पाहत असाल तर खाली दाखवल्याप्रमाणे Get Aadhaar पर्यायामध्ये “Order Aadhaar PVC Card” हा पर्याय निवडा.
aadhaar pvc card
  • नंतर मोबाईल मध्ये पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल, या पेज वरती तुम्हाला आधार कार्ड संबधित विविध सेवांचा लाभ घेता येईल. त्यामध्ये पुन्हा Order Aadhaar PVC Card हा ऑप्शन निवडा
आधार पीव्हीसी कार्ड
आधार पीव्हीसी कार्ड
  • खाली दाखल्याप्रमाणे प्रथम आपला आधार कार्ड नंबर टाका नंतर खालील चौकोनामधील अक्षरे (captcha) कोड टाका.
  • आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर Send OTP वरती क्लिक करा. मोबाईल नंबर लिंक नसेल तर My Mobile Number is not registered वर क्लिक करा नंतर खालील मोबाईल नंबर टाकण्यासाठी ऑप्शन येईल.
  • मोबाईल नंबर टाकून Send OTP बटन वर क्लिक करा.
  • दिलेल्या नंबर वरती एक सहा अंकी OTP येईल. हा Enter OTP वर क्लिक करून टाकून घ्या.
  • Terms and ऑप्शन वरती क्लिक करावे लागेल.
  • Submit वरती क्लिक करा. पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल.
  • फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे पर्याय निवडा.
AADHAAR CARD UPDATE
AADHAAR CARD UPDATE
  • Make Payment वरती क्लिक करून आपण डेबिट कार्ड, युपीआय, नेट बँकिंगच्या माध्यमातून आपण ५० रु पेमेंट करू शकता.
  • पेमेंट केल्यानंतर तुम्हाला अर्ज क्रमांक मिळेल. यावरून आपण स्टेटस चेक करू शकता.

Similar Posts

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *