ग्रामपंचायत ऑपरेटर कामाची वेळ किती

Computer Oprator Time Tab

Computer Operator Time Table : ग्रामपंचायत ऑपरेटर कामकाज वेळेबाबत महत्वाची माहिती.

नमस्कार संगणक परिचालक बंधुंनो आजच्या लेखात आपणांस सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाबाबत महत्वाची अशी माहिती पाहणार आहोत.

बऱ्याच वेळेस ग्रामपंचायत संगणक परिचालक यांच्या वेळेबाबत ग्रामपंचायत मध्ये चर्चा होत असते.

ग्रामपंचायत स्तरावर हा प्रश्न नेहमी विचारला जातो. यामुळे संगणक परिचालक याला या प्रश्नाला सामोरे जावे लागते.

थोडक्यात माहिती :

राज्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालक/ग्रामपंचायत संगणक परिचालक हे वेगवेगळ्या प्रकारे कार्यालयीन कामकाज करीत आहे.

काही ठिकाणी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वा. पर्यंत आहे.

तसेच काही ठिकाणी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वा. पर्यंत तर काही ठिकाणी ११ ते संध्याकाळी ६ अशी वेगवेगळी कार्यालयीन वेळ असून आपले सरकार सेवा केंद्र चालक/ग्रामपंचायत संगणक परिचालक यांची कार्यालयीन वेळ काय आहे.

याबाबत शासनाकडे विचारणा होत आहे. याबाबतची संभ्रमावस्था दूर करण्यासाठी आवश्यक ते आदेष निर्गमित करण्याची बाब विचारधीन होती.

शासन परिपत्रकानुसार ग्रामपंचायत ऑपरेटर/संगणक परिचालक यांची कामाची वेळ काय :

शासन निर्णय : दि. ११ ऑगस्ट, २०१६ अन्वये राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रांमध्ये CSC-SPV या कंपनी मार्फत केंद्र चालकांची नियुक्ती करण्यात आली, ग्रामपंचायत कॉम्पुटर ऑपरेटर/संगणक परिचालक कोणतेही शासकीय कर्मचारी आणि अथवा निमशासकीय कर्मचारी नाहीत ते खाजगी उद्योजक (Village Level Entrepreneur) आहेत. सदरहू आपले सरकार सेवा केंद्रांमधून ग्रामपंचायतीतील विविध कामां संबंधित डेटा एन्ट्री (G2G) ची कामे करण्यात येतात. उदा. जिपीडीपी,प्रियासॉफ्ट, M-Actionsoft, ई-ग्रामसॉफ्ट इ. संगणक प्रणालींवर माहिती भरण्यात येते. तसेच ग्रामपंचायातीच्या हद्दीतील रहिवाश्यांना जन्म मृत्यू प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र इ. विविध प्रकारचे दाखले (G2C) सेवा देण्यात येतात. तसेच या व्यतिरिक्त लाईट बिल भरणा, टेलीफोन बिल भरणा, रेल्वे आरक्षण इ. (B2C) सेवा देण्यात येतात. तसेच बँकांशी अनेक वित्तीय संस्थांशी संबंधित इतर सेवा (FI) देखील देण्यात येतात.

वरीलपैकी G2G आणि G2C सेवा या ग्रामपंचायतीच्या कामाशी निगडीत असल्याने ग्रामपंचायतींच्या कार्यालयीन कामाच्या वेळेत केंद्र चालकांनी काम करणे आवश्यक आहे. उर्वरित B2C आणि Fi या सेवा संबंधित केंद्र चालक हा खाजगी उद्योजक या नात्याने सेवा देत असल्याने कामकाजाची वेळ संबंधित केंद्र चालकाने आवश्यकतेनुसार ठरवावे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *