PM किसान योजनेचा १९ वा हप्ता या दिवशी जमा होणार PM Kisan 19th Installment Date

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शेतकऱ्यांना लवकरच पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता मिळणार आहे. १९ वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार? व कोणत्या खात्यामध्ये जमा होणार? या बद्दल संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे .
PM kisan 19th installment date
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना प्रती वर्ष ६००० हजार रुपये योजनेमधून दिले जातात. आता पर्यंत शेतकऱ्यांना १८ हप्ते मिळाले असून लवकरच १९ हप्ता मिळणार आहे. हा १९ वा हप्ता शेतकऱ्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. शेतकऱ्यांना किसान योजनेचा १९ वा हप्ता दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता ९.७ करोड शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.
