AH Mahabms Online; लाभार्थींनी उद्यापासून हे काम करा तरच मिळेल योजनेचा लाभ
AH Mahabms Online : शेळी मेंढी, दुधाळ गाई म्हैस, कुक्कुटपालन, तलंगा गट वाटप यासाठी अर्ज (mahabms online application) केलेल्या लाभार्थींना योजनेमध्ये निवड झालेल्या लाभार्थींना मेसेज पाठविण्यात आले आहे. ज्यांना निवड झालेले मेसेज आले आहेत अशा लाभार्थींनी ऑनलाईन कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
AH Mahabms Online
कागदपत्रे अपलोड करण्यासाठी लाभार्थींना दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच पोर्टल वरती कागदपत्रे अपलोड करण्यासाठी दिनांक ०४ फेब्रुवारी २०२३ पासून कागदपत्रे अपलोड करा म्हणून ऑप्शन देण्यात येणार आहे.
निवड झालेल्या लाभार्थींना दिलेल्या कालावधी मध्ये कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे.”mahabms” तरच त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच कागदपत्रे अपलोड करण्यासाठी लाभार्थींनी पोर्टल वरती लॉग इन करण्यासाठी युजरनेम/वापरकर्ता नाव आधार नंबर व फॉर्म भरताना जो बँकचे खाते क्रमांक दिला आहे. पासवर्ड हा खाते क्रमांकाचे शेवटचे ६ अंक टाकून लॉग इन करावे.
लॉग इन “ah mahabms login” करण्यासाठी OTP पासवर्ड सिस्टम बंद करण्यात आली आहे. यामुळे पासवर्ड हा लाभार्थींनी खाते क्रमांकाचे शेवटचे सहा अंक टाकावे. दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ ला लाभार्थी अंतिम यादी जाहीर होणार आहे.