व्हॉट्सॲपवरून करता येणार ही कामे : Bank Of Maharashtra Whatsapp Banking

Bank Of Maharashtra Whatsapp Banking

Bank Of Maharashtra Whatsapp Banking : बँक ऑफ महाराष्ट्र खातेधारकांसाठी महत्वाची बातमी, जस कि बँकेचे स्टेटमेंट असो, किंवा नवीन खाते उघडायचे बँकेने खाते धारकांसाठी अनेक सुविधा या मोबाईल वरती उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तसेच बँकेने आता व्हॉट्सॲप वरतीसुद्धा बँकिंग सुविधा दिलेली आहे.

Bank Of Maharashtra Whatsapp Banking

आता बँक ऑफ महाराष्ट्र, खातेधारकांना बँक संबंधित कामे व्हॉट्सॲप करता येणार आहेत.

  • बँक खाते
  • कर्ज खाते
  • कर्ज
  • विमा
  • आपल्या जवळील ATM इ. सुविधाचा लाभ घेता येणार आहे.

बँक खाते संबधित बँक खात्यातील शिल्लक तपासणे, चेकचे स्टेट्स चेक करणे, लघु विवरण, चेक बुक मागविणे, आपला CIF जाणून घेणे, पेन्शन स्लीप, शासकीय योजनांची माहिती इ. सेवा खातेधारकांना व्हॉट्सॲप वरती मिळणार आहे. यामुळे नागरिकांना बँकेत जाण्याची गरज पडणार नाही.

व्हॉट्सॲप बँकिग सुविधेचा कसा लाभ घ्यावा?

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपले खाते हे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये असणे गरजेचे आहे. याकरिता बँक खात्याशी मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. तसेच मोबाईल नंबरवरती व्हॉट्सॲप सुरु असावे.

बँक खात्याशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरून 7066036640 या नंबर वरती Hi मेसेज करावा.

  • सर्व प्रथम भाषा निवडण्यासाठी ऑप्शन येईल. त्यामधून भाषा निवडावी.
  • अटी व शर्ती स्वीकारण्यास सांगेल, आपण अटी व शर्ती वाचूनच स्वीकारा.
  • त्यानंतर निवड करू इच्छिता म्हणून एक कि रद्द करू इच्छिता हे पर्याय येतील त्यामधून आपण निवड हा पर्याय निवडू शकता.
  • लगेच तुम्हाला मेनू हा पर्याय येईल. त्यामधून आपण हवी असलेली सेवा निवडू शकता.
  • उदा. बँक खात्यातील शिल्लक चेक करायची असेल तर बँक खाते-तुमची शिल्लक जाणून घ्या वरती क्लिक करावे.
  • त्यानंतर बँक खाते नंबरचे शेवटचे ४ अंक टाकावे लागतील. लगेच बँक खात्यातील शिल्लक तुम्हाला पाहायला मिळेल.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *