BhuNaksha Maharashtra; गट नंबर टाका आणि जमिनीचा नकाशा पहा मोबाईलवर
Bhunaksha Maharashtra : बऱ्याच जनांणा माहिती नसते आपल्या जमिनी शेजारी कोणते गट आहेत, किंवा कोणाची जमीन आहे. आपल्याकडे जर नकाशा “BhuNaksha” असेल तर आपण काही मिनिटामध्ये हे शोधू शकतो. तसेच काही वेळेस आपल्याला जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी लागतो. जमिनीचा नकाशा मोबाईलवरून कसा काढायचा याबद्दल सविस्तर संपूर्ण माहिती यालेखात दिलेली आहे.
Bhunaksha Maharashtra Online (भू नक्शा महाराष्ट्र)
जमिनीचा नकाशा “भू नक्शा महाराष्ट्र” आपण मोबाईल वरून काढू शकतो. नकाशा काढण्यासाठी कुठेही जावे लागणार नाही. पीडीएफ फाईल मध्ये हा नकाशा आपण काढू शकता. शासनाची नकाशा पाहण्यासाठी स्वतंत्र वेबसाईट/संकेतस्थळ उपलब्ध आहे. संकेतस्थळावरून आपण घरबसल्या कोणत्याही गावातील जमिनीचा नकाशा काही मिनिटामध्ये मोबाईल वरती पाहू शकता किंवा डाऊन+लोड करू शकता.
शासनाने नागरिकांसाठी जमिनी संबधित विविध सेवा ऑनलाईन सुरु केल्या आहेत. उदा. शेतजमिनीचा ऑनलाईन सातबारा बघणे, ८अ उतारा, जमिनीचा फेरफार उतारा/भूमी अभिलेख फेरफार, जुने फेरफार, जुने सातबारा, चालू फेरफार, आपली चावडी, फेरफार डाऊनलोड, मालमत्ता पत्रक पाहणे, ई-नकाशा/भू नकाशा “jamin map with survey numbers” MahaBhunakasha (Maps With Land Records), ई-मोजणी, ई-पिक पाहणी, ई-चावडी, जमीन महसूल भरणा, फेरफार स्थिती अशा अनेक सुविधा ऑनलाईन सुरु करण्यात आलेल्या आहेत. नागरिक इ. सुविधेचा लाभ घरबसल्या मोबाईल वरून घेऊ शकतात.
mahabhunakasha mahabhumi gov in
जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी शासनाने https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.jsp हि साईट उपलब्ध करून दिली आहे. जमिनीचा नकाशा “mahabhunakasha” पाहण्यासाठी आपल्याकडे गट नंबर असणे गरजेचे आहे. गट नंबर नसेल तर आपण https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या वेबसाईट वरून जमिनीचा गट नंबर शोधू शकता.
जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा? (bhunaksha maharashtra 7/12)
जामिनीचा नकाशा (bhunaksha maharashtra) काढण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा. मोबाईल/कॉम्पुटर मध्ये क्रोम ब्रावजर ओपन करून https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.jsp हि साईट त्यामध्ये ओपन करावी. साईट वरती लोड असल्यामुळे साईट ओपन होण्यास वेळ लागू शकतो.
- Land Map Maharashtra : साईट ओपन केल्यानंतर खाली फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे Desktop Site हा पर्याय सुरु करा.
- साईट ओपन केल्यानंतर खालील फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे डाव्या बाजूला तीन रेषा दिसतील त्यावरती क्लिक करा.
- वरील फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे Category ऑप्शन मधून ग्रामीण असेल तर Rural शहरी असेल तर Urban पर्याय निवडावा.
- जिल्हा, तालुका, गाव, निवडावे त्यांनतर Search By Plot No खालील चौकोनात गट नंबर टाकावा.
- Select By Plot No यामधून पुन्हा आपला गट नंबर निवडा.
- नकाशा “jamin map” पाहण्यासाठी पुन्हा डाव्या बाजूच्या वरील तीन रेषा यावरती क्लिक करा, आपल्या जमिनीचा नकाशा तुम्हाला पाहायला मिळेल.
अशा प्रकारे आपण जमिनीचा नकाशा मोबाईल वरती पाहू शकता, नकाशा डाऊनलोड करण्यासाठी Map Report या पर्याय वरती क्लिक करा.
Mahabhunakasha 7/12
Citizens can download site/land map from “MahabhuNaksha” site to mobile/computer within few minutes. No need to go anywhere to draw a map. Complete information on how to draw a map is given in this article. Citizens can check the land map from https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in.