लाडकी बहिण या महिलांचा लाभ होणार बंद : Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana New Update

Ladki Bahin Yojana New Update : लाडकी बहिण योजनेतून पात्र लाभार्थी महिलेला प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात. लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी हि अत्यंत महत्वाची माहिती, आता फक्त याच महिलांना मिळणार लाडकी बहिण योजनेचा लाभ, तुम्हाला मिळणार का? पहा सविस्तर माहिती.

Ladki Bahin Yojana Maharashtra

महाराष्ट्र लाडकी बहिण योजना सध्या खूप चर्चेत आहे. या योजनेमुळे अनेक महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये मिळत आहे. राज्यात २०२४ मध्ये लाडकी बहिण योजना सुरु झाली आहे. या योजनेसाठी अर्ज सुरु झाल्यानंतर राज्यातील अनेक महिलांनी अर्ज केले होते, यामध्ये अर्ज मंजूर झालेल्या महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळत आहेत, ज्या महिलांच्या खात्यावर दीड हजार रुपये जमा झाले नाहीत अशा महिलांनी आपले आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक करून घेणे आवश्यक आहे.

लाडकी बहिण योजनेमध्ये अनेक महिला योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र असून देखील योजनेचा लाभ घेत आहेत हे शासनाच्या निदर्शनास आले आहे आहे. यामुळे शासनाने अशा अर्जाची छाननी प्रक्रिया सुरु केली आहे. यामध्ये अनेक महिला योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरत आहे तसेच यामध्ये काही महिला आयकरदाता (Income Tax Return) भरणारे असून देखील योजनेचा लाभ घेत आहे असे शासनाच्या निदर्शनास आले आहे, आता प्राप्तीकर विभागाच्या अखत्यारीत असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) लाभार्थी माहिती उपलब्ध करून देण्यात मान्यता दिली आहे. आता लवकरच आयकर भरणाऱ्या (Income Tax Return) लाभार्थी महिलांची यादी तयार केली जाणार आहे. अशा लाभार्थी महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही.

लाडकी बहिण योजनेचा लाभ कोणाला मिळणार

  • लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन हे २ लाख ५० हजार (अडीच लाख) पेक्षा कमी असावे.
  • विवाहित, विधवा, परित्यक्ता आणि निराधार व घटस्फोटीत महिला तसेच कुटुंबातील एक अविवाहित महिला यांना योजनेचा लाभ मिळेल.
  • लाभार्थी महिलेचा आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी महिलेचे वय हे १८ ते ६५ दरम्यान असणे आवश्यक आहे.

Related Posts...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *