महाडीबीटी योजना अर्ज झाले बंद, या दिवशी सुरु होणार नवीन अर्ज

Mahadbt farmer application update : शेतकरी बांधवांसाठी महत्वाची माहिती, शेतकऱ्यांसाठी शासनाने महाडीबीटी पोर्टल वरती विविध योजनांकरिता अर्ज करणे सोपे व्हावे म्हणून महाडीबीटी पोर्टल शेतकऱ्यांना अर्ज योजनांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या पोर्टल शेतकरी शेती संबंधित योजनाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात.
Mahadbt farmer application update
महाडीबीटी पोर्टल वरती शेतकरी शेती संबंधित विविध औजारे, यंत्र, शेततळे, शेततळे अस्तरीकरण, पॉवर टिलर, पंप, इंजिन, मोटर, पाईप, कांदाचाळ, फळबाग लागवड योजना इ. अशा अनेक योजनांसाठी शेतकरी ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या अर्ज करू शकतात. परंतु आता नवीन अर्ज भरणे काही दिवसाकरिता तात्पुरत्या स्वरुपात बंद आहेत.
शेतकरी बांधवांसाठी महत्वाची सूचना
महाडीबीटी पोर्टल मध्ये करण्यात येत असलेल्या सुधारणांमुळे नवीन अर्ज प्रक्रिया तात्पुरत्या स्वरुपात बंद आहे. दि. १५ एप्रिल २०२५ नंतर अर्ज प्रक्रिया सुरु होईल. शेतकरी १५ एप्रिल २०२५ नंतर विविध योजनांसाठी महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज करू शकतात.
