महामेष योजना लाभार्थी यादी पहा : Mahamesh Yojana labharthi list 2023
Mahamesh Yojana labharthi list 2023 : महामेष योजना “राजे यशवंतराव होळकर महामेष योजना” योजनेतून लाभार्थीला मेंढीपालनास ७५% अनुदान दिले जाते. दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ ते ७ डिसेंबर २०२२ मध्ये योजनेचे अर्ज सुरु होते. प्राथमिक निवड यादी दि. १ फेब्रुवारी २०२३ ते ७ फेब्रुवारी २०२३ मध्ये काढण्यात आली आहे.
Mahamesh Yojana labharthi list 2023
ज्या लाभार्थींची योजनेमध्ये निवड झाली आहे त्यांना योजनेच्या वेबसाईट वरती कागदपत्रे अपलोड करायची आहेत. त्यासाठी २० फेब्रुवारी २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
अर्जदारांना प्राथमिक निवड यादी मोबाईल वरती पाहता येणार आहे. यादी पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.
- सर्वप्रथम http://www.mahamesh.co.in/en हि वेबसाईट मोबाईलमध्ये ओपन करावी.
- क्रोम मध्ये ओपन करा आणि ब्रावझर Desktop मोड करून घ्या.
- खाली दाखवल्याप्रमाणे तुम्हाला पर्याय दिसतील त्यामधून “महामेष योजना” हा पर्याय निवडा.
- त्याठिकाणी तुम्हाला विविध पर्याय पाहायला मिळतील. त्यामधून लाभार्थीची प्राथमिक आणि अंतिम निवड यादी हा पर्याय निवडावा.”Mahamesh Yojana labharthi list“
- लाभार्थीची प्राथमिक निवड यादी आणि लाभार्थ्याची अंतिम निवड यादी हे दोन पर्याय दिसतील.
- आपण प्राथमिक निवड यादी पाहणार आहोत. त्यासाठी प्राथमिक निवड यादी वर क्लिक करा.
- संपूर्ण जिल्ह्यांच्या याद्या तुम्हाला पाहायला मिळतील.
- तुम्हाला ज्या जिल्ह्याची यादी पहायची आहे. त्यासमोर Preliminary List पर्याय दिसेल त्यवर क्लिक करा. लगेच संपूर्ण जिल्ह्याची यादी ओपन होईल.
अर्जदारांनी यादीमध्ये आपले नाव चेक करावे नाव असेल तर लगेच आपली कागदपत्रे अपलोड करावी. कागदपत्रे अपलोड करण्याची अंतिम मुदत २० फेब्रुवारी २०२३ पर्यंत आहे.