Mahaegram citizen : ग्रामपंचायत दाखले,उतारे मिळणार ऑनलाईन
Mahaegram citizen connect : नागरिकांना ग्रामपंचायत सुविधांचा लाभ घेण्यासाठी नवीन ॲप लॉंच करण्यात आले आहे. नागरिकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.
ग्रामपंचायतच्या खालील सुविधा होणार ऑनलाईन
- असेसमेंट उतारा
- जन्म नोंदीचा दाखला
- दारिद्य्र रेषेखालील दाखला
- मृत्यू नोंदीचा दाखला
- विवाह नोंदीचा दाखला
- कर भरणा (घरपट्टी/पाणीपट्टी इ.)
- ग्रामपंचायत पदाधिकारी यांची माहिती
mahaegram citizen या सुविधांचा लाभ कसा घ्यावा.
नागरिकांना वरील सुविधांचा लाभ घेण्यासाठी मोबाईल मध्ये प्ले-स्टोर वरून mahaegram citizen Connect हे ॲप घ्यायचे आहे.
त्यामध्ये प्रथम नोंदणी करायची आहे.
mahaegram registration
- ॲप ओपन करा आणि Don’t Have account Register पर्यायावर क्लिक करा.
- प्रथम आपले नाव, वडिलांचे/पतीचे नाव आणि आडनाव, मोबाईल नंबर, ई-मेल इतर वैयक्तिक माहिती भरा आणि जतन वरती क्लिक करा.
- आपण दिलेल्या मोबाईल नंबर वरती ओटीपी येईल तो टाका आणि CONFIRM करा.
- तुमच्या मोबाईल नंबर वरती पासवर्ड पाठविला जाईल.
- User name – मोबाईल नंबर टाका.
- Pass Word – मोबाईल नंबर वरती पाठविलेला टाकून आपण लॉग इन करा.
- आपला जिल्हा, तालुका, गाव इतर माहिती भरा आणि आपल्या ग्रामपंचायत सुविधांचा घरबसल्या लाभ घ्या.
- आपण यशस्वीरीत्या लॉग इन झाला व्हाल. खालील सुविधांचा आपणास लाभ घेता येईल.
Kendra Chalak ha udyajak asalyane Tyacha GramPanchayat madhey Time Nichit nahi
Login kel pn Mumbai Suburban nivadnya sathi konta Jilha, Taluka ani Grampanchayat nivdave kalat nahi.
me google var dekhil pahila pn kahi kalena.
krupaya sahkarya karave.
🆕 job card