पोलीस भरती अर्ज भरण्यासाठी मुदत वाढली; Police Bharti Last Date Maharashtra
Police Bharti Last Date Maharashtra : महाराष्ट्र पोलीस विभागामध्ये होणाऱ्या विविध पदांच्या भरतीसाठीची अधिसूचना 1 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती, पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत हि 31 मार्च 2024 पर्यंत देण्यात आली होती. परंतु आता हि मुदत वाढविण्यात आली आहे.
राज्य शासनाकडून मराठा आरक्षण संमत केले असून त्याची अंमलबजावणी प्रक्रिया शासन स्तरावर सुरु आहे. यामुळे उमेदवारांना SEBC प्रमाणपत्र काढण्यास विलंब होत असल्यामुळे सर्व अर्जदारांना/उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी (police bharti 2024 date maharashtra last date) मुदत वाढवून देण्यात आली आहे.
पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शासनाकडून मुदत वाढ देण्यात आली आहे, यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2024 देण्यात आली होती, आता यामध्ये 15 दिवसाची मुदत वाढ करण्यात आली आहे, आता अर्ज करण्याची अंतिम मुदत हि 15 एप्रिल 2024 देण्यात आली आहे.
काही उमेदवारांना अंतिम दिनांकापूर्वी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास उमेदवार प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाची पोचपावती अर्जासोबत जोडून अर्ज सादर करू शकतात. परंतु कागदपत्रे पडताळणीवेळी विहित नमुन्यातील असणारी सर्व कागदपत्रे उमेवादाराकडे असणे आवश्यक आहे.