आज १० वी चा निकाल जाहीर होणार येथून पहा निकाल ; SSC Result Link
SSC Result 2024 maharashtra board website official website : अखेर प्रतीक्षा संपली, 12 वी च्या निकालानंतर आता 10 वी च्या निकालाची तारीख जाहीर झाली असून विद्यार्थ्यांना लवकरच निकाल ऑनलाईन वेबसाईटवर पहायला मिळणार आहे, 10 वी च्या विद्यार्थी मित्रांसाठी हि आनंदाची बातमी.
SSC Result Maharashtra Board
इ.१० वी ची मार्च २०२४ मध्ये झालेल्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, अमरावती, लातूर, नाशिक व कोकण विभागीय मंडळामार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल दिनांक 27 मे 2024 रोजी दुपारी १:०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.
दहावीच्या परीक्षेचा निकाल 27 मे 2024 दुपारी एक वाजता ऑनलाईन लागणार आहे. विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी मंडळाने विविध साईट/संकेतस्थळ उपलब्ध करून दिलेले आहेत. यावर्षी 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांनी इ.10 वीची परीक्षा दिलेली आहे. ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना काही दिवसा नंतर मार्कशीट मिळेल.
निकालाची तारीख | 27 मे 2024 |
निकालाची वेळ | दुपारी १:०० वाजता |
खालील साईट वरून आपण निकाल पाहू शकता
- https://mahresult.nic.in
- http://sscresult.mkcl.org
- https://sscresult.mahahsscboard.in
- https://results.digilocker.gov.in
वरील लिंक/साईट वरून आपण इ.10 वी चा निकाल मोबाईल वरून पाहू शकता, निकाल ऑनलाईन जाहीर होण्यासाठी फक्त काही तास बाकी आहे. हि पोस्ट सेव्ह करून ठेवा, आपल्या मित्रांना हि पोस्ट शेअर करायला विसरू नका.