लाडकी बहिण योजनेचा अर्ज रद्द झाला? आधी हे काम करा ladki bahin yojana form rejected

ladki bahin yojana form rejected

ladki bahin yojana form rejected : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना संबंधित महत्वपूर्ण माहिती, महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली असून योजनेमधील पात्र लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये शासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून दिले जाणार आहे. सदर योजनेसाठी १ जुलै २०२४ पासून ऑनलाईन अर्ज भरणे सुरु झालेले आहेत.

ladki bahin yojana form rejected problem solution

राज्यातील अनेक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत, अर्ज केल्यानंतर पुढे अर्जाचे काय होणार? तसेच अर्ज रद्द/ladki bahin yojana form rejected झाला तर काय करायचं? तसेच फॉर्म Disapproved झाल्यानंतर काय करायच? या बद्दल संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये दिलेली आहे.

राज्यातील महिलांकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी चांगला प्रतिसाद दिला असून अनेक महिलांनी योजनेसाठी अर्ज केलेले असून अनेक महिलांचे अर्ज हे मंजूर झाले असून ते या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरल्या आहेत, तसेच अनेक महिलांचे हे review मध्ये असून लवकरच त्यांचे अर्ज सुद्धा मंजूर होतील. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास अर्जदाराला एसएमएस द्वारे कळविले जाते. काही दिवसापासून no new form accepted error in ladki bahin yojana नवीन अर्ज भरताना अडचणी येत आहेत व नवीन अर्ज सबमिट होत नाहीत. लवकरच हि अडचण दूर करून नवीन अर्ज भरण्यासाठी वेबसाईट पोर्टल व अँप मधून अर्ज भरण्याची सुविधा सुरु केली जाणार आहे.

Mukhyamantri ladki bahin yojana status maharashtra

अँपमधून अर्ज केलेल्या अर्जदारांना अँप मध्ये अर्जाचे स्टेटस चेक करता येणार आहे. ज्या लाभार्थींनी वेबसाईट पोर्टलद्वारे अर्ज भरलेले असतील त्यांना वेबसाईट वरती अर्जाचे स्टेटस चेक स्टेटस चेक करता येईल. लवकरच अँपद्वारे अर्ज भरण्याची सुविधा हि सुरु होईल, ज्या लाभार्थींनी अर्ज केलेले आहेत त्यांनी आपला अर्ज मंजूर झाला आहे का? किंवा अर्ज रिजेक्ट झाला आहे? हे चेक करून पुढील कार्यवाही पूर्ण करावी. म्हणजेच अर्ज मंजूर झाला असेल तर लाभार्थीला काही काही करण्याची आवश्यकता नाही. परंतु ज्या लाभार्थींचे अर्ज हे रिजेक्ट किंवा disapproved झाले असतील तर त्यांनी अर्जाचे लाडकी बहिण योजना स्टेटस चेक करणे गरजेचे आहे व अर्जामधील त्रुटीचे निराकरण करावे.

हे पण वाचा »  ladakibahin.maharashtra.gov.in Registration and Login

लाडकी बहिण योजनेचा अर्ज रिजेक्ट झाला असेल तर काय करावे?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज नामंजूर झाला असेल तर सर्वप्रथम आपण अर्जाचे स्टेटस चेक करणे आवश्यक आहे. आपला अर्ज कोणत्या कारणामुळे नामंजूर झाला आहे हे चेक करण्यासाठी आपण जर मोबाईल अँपमधून अर्ज भरला असेल तर अँप ओपन करून त्यामध्ये केलेले अर्ज हा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करावे व आपले नाव व अर्जाचा क्रमांक इतर माहिती अर्जाचे स्टेटस तुम्हाला त्याठिकाणी पाहायला मिळेल.आपल्या नावावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्जाची संपूर्ण माहिती दिसेल व अर्ज रिजेक्ट ladki bahin yojana form rejected झाला असेल तर त्याठिकाणी कोणत्या कारणामुळे अर्ज रिजेक्ट झाला आहे याचे स्टेटस दिसेल.

अर्ज नामंजूर होण्याचे कारण त्याठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. अनेक अर्ज हे आधार वरील नाव व अर्जामध्ये भरलेले नाव हे वेगवेगळे असल्यामुळे नामंजूर होत आहेत, तसेच चुकीचे कागदपत्रे अथवा चुकीचा अर्ज/चुकीची माहिती भरल्यामुळे सुद्धा अर्ज नामंजूर होत आहे. लाभार्थींनी अर्ज अचूक भरून संबधित आवश्यक कागदपत्रे पोर्टल वरती अपलोड करावी. अर्ज रिजेक्ट झाल्यानंतर अर्ज पुन्हा अपडेट/edit करण्यासाठी पर्याय दिलेला आहे, edit या पर्यायामधून अर्ज दुरुस्त करता येणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अर्ज मंजूर कधी होणार?

ज्या लाभार्थींनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत त्यांचे अर्ज चेक करण्याचे काम सुरु आहे. अर्ज केल्यानंतर अर्जाचे स्टेटस हे Submit असे दाखवेल. आपला अर्ज हा चेक करण्याचे प्रोसेस मध्ये असल्यास अर्जाचे स्टेटस हे In Reviewed असे दाखवेल. त्यानंतर अर्जामध्ये काही त्रुटी नसल्यास आपला अर्ज हा मंजूर केला जाईल. अर्ज मंजूर झाल्यानंतर लाभार्थीला एसएमएस द्वारे कळविले जाते आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी लाभार्थी ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईट पोर्टल वरून अर्ज करू शकतात. तसेच नारीशक्ती दूत अँप मधून सुद्धा लाभार्थींना अर्ज करता येईल.

Similar Posts

8 Comments

  1. Nari doot app vr from bharla approved jhala pan paise nhi aale ani online check kelyavr data not found dakhvat ahe

  2. Ladki bahin cha from nari shakti madhun bharla pan te aprove jhale tri paise aale nahi kay krave lagel

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *