आपले सरकार सेवा केंद्रासाठी फॉर्म सुरु : Aaple Sarkar Seva Kendra

Aaple Sarkar Seva Kendra vacancy

Aaple Sarkar Seva Kendra vacancy : आपले सरकार सेवा केंद्रासाठी ऑनलाईन फॉर्म सुरु झालेलं आहेत, हे फॉर्म कोणत्या जिल्ह्यासाठी सुरु झाले आहेत, अर्ज कुठे करावा लागेल, कागदपत्रे कोणती लागतील संपूर्ण माहितीसाठी हा लेख वाचा.

Aaple Sarkar Seva Kendra Vacancy

आपले सरकार सेवा केंद्राकरिता अकोला जिल्हामधील ग्रामपंचायत, नगरपंचायत, महापालिका प्रभाग, नगर परिषद, नगर पंचायत स्थापित करण्यासाठी अर्ज/फॉर्म सुरु करण्यात आले आहेत. स्थानिक सीएससी केंद्र चालक आपले सरकार सेवा केंद्र करिता फॉर्म भरू शकतात.

अधिक माहितीसाठी https://akola.gov.in/ या संकेतस्थळावर Notice – Anouncement मध्ये तुम्हाला अर्जाची लिंक मिळेल.

अर्ज कोणत्या जिल्ह्यात सुरु झाले आहेत?अकोला
अर्ज सुरु दिनांक०८/०२/२०२३ (सकाळी.११)
अंतिम दिनांक२०/०२/२०२३ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
जाहिरातपहा
Aaple Sarkar Seva Kendra Vacancy

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे?

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • नमुना अर्ज
  • शाळा सोडल्याचा दाखला/जन्माचा दाखला
  • किमान दहावी (SSC) पास असलेले शैक्षणिकगुणवत्ता प्रमाणपत्र
  • एमएस-सीआयटी/MC-CIT प्रमाणपत्र
  • सीएससी/CSC केंद्रचालक असल्यास सीएससी/CSC प्रमाणपत्र
  • PAN कार्ड

आपले सरकार सेवा केंद्र काय आहे?

आपले सरकार सेवा केंद्रामार्फत विविध सुविधा दिल्या जातात. शेतकरी योजना, शासकीय दाखले, प्रमाणपत्रे, शैक्षणिक दाखले, ऑनलाईन फॉर्म भरणे अशा अनेक सुविधा आपले सरकार सुविधा केंद्राद्वारे दिल्या जातात.

यामुळे ऑनलाईन सुविधा नागरिकांना आपल्या गावामध्ये सहज उपलब्ध होतात. तसेच आपले सरकार सेवा केंद्राचे अनेक फायदे आहेत.

आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज कुठे करावा?

आपल्या जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्र जागा रिक्त असल्यास संबधित जिल्ह्याच्या अधिकृत पोर्टलवरती त्याची जाहिरात प्रसिद्ध केली जाते. केंद्रासाठी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने घेतले जातात.

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *