या जिल्ह्यात महा ई सेवा केंद्रासाठी अर्ज सुरु | Aaple Sarkar Seva Kendra Vacancy
Aaple Sarkar Seva Kendra Vacancy : ग्रामीण तसेच शहरी भागात नागरिकांपर्यंत शासकीय आणि निमशासकीय तसेच खाजगी सेवा पोहोचविण्याचे काम आपले सरकार सेवा केंद्राद्वारे केले जाते. यामुळे नागरिकांना शासकीय दाखले प्रमाणपत्र वेळेवर मिळतात.
गडचिरोली जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज सुरू झाले आहेत. आपले सरकार सेवा केंद्र हे शासन निर्णय दिनांक १९ जानेवारी २०१८ च्या परिच्छेद १(अ) व (आ) मधील निकषानुसार स्थापन करावयाचे आहे. आणि हे केंद्र ग्रामपंचायत स्तरावर ३५१ आणि नगरपंचायत स्तरावर ०३ स्थापन करावयाचे आहे. तर याची अंतिम तारीख काय असेल, पात्रता काय असेल अटी व शर्ती यासाठी खालील माहिती वाचा.
या जिल्ह्यात महा ई सेवा केंद्रासाठी अर्ज सुरु | Aaple Sarkar Seva Kendra
तपशील | – |
जिल्हा | गडचिरोली |
अर्ज सुरू दिनांक | २७/०६/२०२२ |
अंतिम दिनांक | २५/०७/२०२२ |
अर्जाची प्रक्रिया | ऑफलाईन मोड |
अर्ज कोठे जमा करावा | गडचिरोली येथील सेतू शाखेत |
अधिकृत जाहिरात | पहा |
जिल्ह्याचे मुख्य संकेतस्थळ | पहा |
ऑफलाईन अर्ज | पहा |
अटी व शर्ती | पहा |
अर्जासोबत जोडावयाचे कागदपत्रे | Aaple Sarkar Seva Kendra Application Document
- आधार कार्ड
- बँक खाते पासबुक
- PAN कार्ड
- अपंग असल्यास अपंगत्वाचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र
- संगणक अनुभव प्रमाणपत्र
अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी
वरील Self attested कागपत्रे असावीत.
अटी व शर्ती काय असतील?
- अर्जदार त्याचा गावचा रहिवाशी असणे आवश्यक आहे. जर नसेल तर त्याच्या जवळच्या गावाचा विचार करण्यात येईल.
- अर्जदार एकाच केंद्रासाठी अर्ज करू शकतो.
- अर्जामधील माहिती योग्य असावी. चुकीची माहिती दिल्यास त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही तसेच त्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल.
- आपला अर्ज गडचिरोली जिल्हा अधिकारी कार्यालयात जमा करावा.
- एकदा केंद्र मिळाल्या नंतर ते त्याच ठिकाणी कार्यरत असावे, दुसऱ्या जागेवर बदल केल्यास केंद्र बंद केले जाईल.
- शासनाद्वारे दिलेल्या सर्व सेवा केंद्रातून वितरीत कराव्या लागतील. शासन निर्णय १९ जानेवारी २०१८ नुसार दिलेल्या सर्व अटी व शर्ती मान्य राहतील.
- शासन निर्णय १९ जानेवारी २०१८ नुसार केंद्राचे रेट बोर्ड केंद्राच्या दर्शनी भागात लावावे. तसेच नागरिकांना बसण्याची सोय असावी. याची पूर्तता करावी लागेल.
- उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी वेळोवेळी दिलेले आदेशाचे पालन करावे. तसेच केंद्राचा अहवाल सादर करावा लागेल.
- सर्व प्रकारची डिजिटल पेमेंट ला प्राधान्य द्यावे लागेल.
- शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार केंद्र सुरु ठेवावे लागेल.
- शासनाने दिलेले सर्व साहित्याचे काटकसरीने वापर करावा तसेच सरंक्षण जतन करणे अनिवार्य राहील.
- महाराष्ट्र माहिती महामंडळ यांनी नियुक्त केलेल्या तांत्रिक अधिकारी केंद्राची संपूर्ण चौकशी करू शकतात.
- नागरिकांची केंद्राबद्दल काही तक्रार असल्यास त्याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल.
- आपले सरकार सेवा केंद्र स्थापित करण्याकरिता कोणत्याही शासकीय परिसरात जागा मिळणार नाही.
प्राधान्य
- अपंगत्व असलेल्या अर्जदारांना प्राधान्य राहिल.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी