ग्रामपंचायत निवडणूक निकाल पहा मोबाईलवर : Gram Panchayat Election Result
Gram Panchayat Election Results : ग्रामपंचायत निवडणूक निकाल आपण मोबाईल वरून पाहू शकता. हा निकाल आपण कुठे पहायचा आणि कसा पाहणार याची संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत.
Gram Panchayat Election Result
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. निवडणुका झाल्यानंतर सर्वांना एकच चिंता असते कि निकाल कसा येईल. “Gram Panchayat Election Result” तसेच हा निकाल सर्व प्रथम कसा पाहायला मिळेल. आपण याठिकाणी आम्ही निकाल पाहण्याची पद्धत सांगणार आहे. त्यामध्ये कोणताही व्यक्ती मोबाईल वरून ग्रामपंचायत निवडणूक निकाल पाहू शकतो.
ग्रामपंचायत निवडणूक निकाल पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.
- आपल्या मोबाईल मध्ये प्ले स्टोर वरून True Voter हे ॲप घ्या.
- ॲप घेतल्यानंतर ते सुरु ओपन करा. आणि पॉप अप मध्ये ऑप्शन मधून Allow ऑप्शन निवडा.
- प्रथम तुम्हाला निवडण्यासाठी इंग्लिश, हिंदी आणि मराठी हे ३ भाषा पर्याय असतील. त्यामधून आपली भाषा निवडा.
- I agree समोरील चोकोनात क्लिक करून NEXT पर्याय वर क्लिक करावे.
- खालील फोटो मध्ये दाखविल्या प्रमाणे स्क्रीन वर मेसेज दिसेल, Cancel हा ऑप्शन निवडा.
- तुमच्या समोर डॅशबोर्ड दिसले त्यामधून Election Result हा ऑप्शन निवडा यावरून आपण निकाल पाहू शकता.
- नंतर आपला मोबाईल नंबर आणि नाव टाकावे लागेल.
- OK बटन वर क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये निवडणूक कार्यक्रमाचे नाव निवडा. नंतर आपला जिल्हा व तालुका निवडा तसेच लोकल बॉडीचा प्रकार निवडा.
- नंतर आपले गाव/ग्रामपंचायत निवडा, तसेच प्रभाग क्रमांक टाका शोधा पर्याय वर क्लिक करा. आपण टाकलेल्या प्रभागाचा निकाल तुम्हाला पाहायला मिळेल.
अशा पद्धतीने आपण निकाल पाहू शकता. हि उपयुक्त माहिती आपल्या मित्रांना पाठवा.
खूप छान माहिती दिली आहे.