नवीन किसान सुविधा वेबसाईट लाँच | Kisan Suvidha Portal

kisan suvidha portal

Kisan Suvidha Portal : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी महत्वाची अशी माहिती घेऊन आलो आहोत.

शेतकऱ्यांसाठी किसान सुविधा हि नवीन सेवा सुरु होत आहे. किसान सुविधा पोर्टल मध्ये तुम्हाला शासकीय योजनेबद्दल माहिती व शेतीशी निगडीत माहिती मिळेल. तसेच पशुपालना विषयी सुद्धा माहिती मिळेल. हि सेवा संपूर्णतः मोफत असणार आहे. शेतकऱ्यांसाठी हे पोर्टल महत्वाचे ठरणार आहे.

किसान सुविधा चा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे स्मार्ट फोन असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला UMANG अॅप इंस्टाल करावे लागेल.

किंवा KISAN SUVIDHA पोर्टल वरती याचा लाभ घेऊ शकता. KISAN SUVIDHA पोर्टल वरती शेतकऱ्याला विविध सेवांचा लाभ घेता येऊ शकतो.(आपल्या गावतील जमीन विक्री कोणी केली पहा ऑनलाईन)

किसान सुविधा पोर्टल वरती कोणत्या सेवा मिळणार? | Kisan Suvidha Portal

Kisan Suvidha Portal शेतकऱ्यांना पीएम किसान योजना, तसेच शेती निगडीत असणाऱ्या योजना उदा. कृषी यांत्रिकीकरण, बियाणे, ठिबक सिंचन योजना अशा भरपूर योजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळेल.

  • खतांचे बाजारभाव रिटेलर कडे असणारा शिल्लक स्टाॅक व त्याचा संपर्क क्रमांक आणि खताच्या किमंती बद्दल किसान सुविधा पोर्टल वरती माहिती मिळेल.(ग्रामपंचायत विभाग संपूर्ण यादी पहा)
  • किसान सुविधा पोर्टल मार्फत पिकाचा विमा उतरवणे तसेच विमाचे स्टेटस चेक करणे, पिक विमा हप्ता Calulator, प्रत्येक विमा कंपनीचे पत्ते आणि मोबाईल नंबर. इ.
  • कृषी विपणन आणि खरेदी.
  • शेतकऱ्मायाला माती परीक्षण कार्ड सुद्धा काढता येईल.
  • शेंद्रीय शेतीबाबत सुद्धा माहिती मिळेल.
  • बियाणे विक्रेता आणि बियांनाबद्दल माहिती.
  • कृषी यंत्राचे निर्माते आणि विक्रेते याची माहिती.
  • कृषी यंत्रासाठी/औजारासाठी अनुदान याची माहिती.
  • आपण कृषी योजनेसाठी अर्ज केला असेल तर अर्जाचे स्टेटस पाहता येईल.

पशुसंवर्धन

किसान सुविधा पोर्टलचा वापर शेतकरी व इतर व्यक्ती सुद्धा करू शकतात. हे पोर्टल शेतकऱ्यांना विविध भाषेमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये शेतकऱ्यांना बाजारभाव याबद्दल सुद्धा माहिती मिळणार आहे.

Kisan Suvidha Portal/किसान सुविधा पोर्टल – येथे क्लिक करा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *