संजय गांधी निराधार अनुदान योजना संपूर्ण माहिती : Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana
Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana : संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यास प्रति महिना पेन्शन दिली जाते. योजनेचा लाभ कोणाला मिळणार? पात्रता, अर्जाबद्दल माहिती, आवश्यक कागदपत्रे इ. माहिती दिलेली आहे.
Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana
संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा (विशेष सहाय्य योजना) लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय हे ६५ वर्ष पेक्षा कमी असावे. ६५ वर्षापेक्षा जास्त वय असल्यास योजनेचा लाभ घेता येणार नाही, तसेच अर्जदार हा निराधार असेल तरच योजनेचा लाभ मिळेल.
योजनेचा लाभ घेणारा लाभार्थी हा किमान १५ वर्षापासून महाराष्ट्रात राहत असावा. तसेच अर्जदार लाभार्थीचे उत्पन्न हे प्रति वर्ष २१,००० रु पर्यंत असावे त्यापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही.
संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत “Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana” लाभ घेणाऱ्या लाभार्थीचे वय हे ६५ वर्ष झाल्यानंतर त्या लाभार्थ्यास इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमध्ये सामावून घेतले जाईल.
निराधार असलेले वय वर्ष ६५ पेक्षा कमी असलेले महिला व पुरुष, अपंगांतील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, अनाथ मुले (१८ वर्षाखालील), निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील पोटगी न मिळालेल्या महिला इ. व्यक्ती योजनेचा लाभ घेऊ शकतात.
संजय गांधी निराधार अनुदान योजना 2023
योजनेचे नाव | संजय गांधी निराधार अनुदान योजना |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्य |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन |
मिळणारा लाभ | आर्थिक सहाय्य |
अर्ज | पहा |
योजनेची संपूर्ण माहिती | पहा |
अर्ज घेण्यासाठी आपण अर्ज पहा वर क्लिक करू अर्ज घेऊ शकता. तसेच हा अर्ज भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून संबधित कार्यालयामध्ये जमा करावा. योजनेच्या अधिक माहितीसाठी https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या साईट वर माहिती पाहू शकता.
संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड
- वयाचा दाखला (जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला दाखला)
- रहिवाशी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- अपंग असल्यास प्रमाणपत्र
- अनाथ असल्यास अनाथ असलेबाबतचा दाखला
- रेशन कार्ड
- अर्जदाराचा फोटो
योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्याला १००० रु पेंशन दरमाह मिळेल. नवीन शासन निर्णयानुसार पेंशन मध्ये वाढ करण्यात आली आहे. (पेंशनमध्ये काही बदल होऊ शकतात)