शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र ऑनलाइन फॉर्म सुरु | Sauchalay Online Registration 2024

sauchalay online registration 2022

Sauchalay Online Registration 2024 : ग्रामीण भागात शौचालय संबधित विविध योजना राबविल्या जात आहे. बऱ्याच कुटुंबाना शौचालय अनुदान मिळाले आहेत. परंतु जे कुटुंब शौचालय लाभापासून वंचित असतील अशा व्यक्ती शौचालयासाठी ऑनलाईन “Sauchalay Online Registration” अर्ज करू शकतील.

शौचालयासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा तसेच यासाठी पात्रता काय असेल याची आम्ही सविस्तर माहिती या लेखात दिलेली आहे.

घरगुती शौचालय असो किंवा सामुदायिक शौचालय बांधताना भूजल आणि जलस्त्रोत दुषित होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे.(हेहि वाचा : आपल्या घराचा उतारा ऑनलाईन काढू शकता.)

शौचालय अनुदानासाठी खालील व्यक्ती पात्र असतील? (sauchalay anudan yojana eligibility)

  • सर्व दारिद्र्यरेषे खालील कुटुंब (BPL)
  • दारिद्र्यरेषे खालील कुटुंब (APL) : यामध्ये घरकुल असलेले भूमिहीन मजूर, अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती, लहान व अत्यल्प भूसुधार शेतकरी, शाररीक दृष्ट्या अपंग असलेली व्यक्ती, महिला प्रमुख कुटुंब इ. योजनेचा लाभ घेऊ शकतात.

शौचालयासाठी किती अनुदान मिळेल? (toilet subsidy in maharashtra)

ज्या कुटुंबांना शौचालय अनुदान लाभ मिळाला नाही अशा कुटुंबांना १२००० रु. अनुदान असेल.

वैयक्तिक शौचालय ऑनलाईन अर्ज? (how to apply for toilet subsidy in maharashtra)

जे कुटुंब वैयक्तिक शौचालय लाभास पात्र असतील ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

अ.क्रप्रकारवेबसाईट
१)योजनाकेंद्र शासन
२)लाभार्थी व्यक्तीAPL & BPL लाभार्थी
३)अर्जाची प्रक्रियाऑनलाईन/Online
४)मुख्य संकेस्थळhttps://sbm.gov.in/
sbm.gov.in online registration

वेबसाईट : ttps://sbm.gov.in/sbm_dbt/secure/login.aspx

किंवा

नोंदणी करिता : https://sbm.gov.in/SBM_DBT/Secure/DBT/DBT_Registration.aspx

  • सर्वात आधी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. नोंदणी करण्यासाठी नोंदणी वेबसाईट चा वापर करावा.
  • नोंदणी करीता आपला मोबाईल नंबर,संपूर्ण नाव,रहिवाशी पत्ता,राज्य इ. थोडक्यात माहिती द्यावी लागेल.
  • नंतर CAPTCHA कोड भरावा लागेल. नंतर Submit बटन वरती क्लिक करा.
  • आपल्या समोर पॉप-अप मध्ये एक मेसेज पाहायला मिळेल. कि आपला पासवर्ड मोबाईल नंबर वरती पाठविला आहे.परंतु मित्रांनो हा पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरचे शेवटचे चार (४) अंक टाकायचे आहेत.(ग्रामपंचायत योजनांची यादी पहा)
  • पुन्हा साईन-इन या पेज वरती तुम्हाला यायचं आहे. येथे तुम्ही मोबाईल नंबर आणि मोबाईल नंबरचे शेवटचे ४ अंक पासवर्ड म्हणून टाकायचे आहेत. खालील कोड भरून Sign In वरती क्लिक करा.
  • पुन्हा एक नवीन पेज सुरु होईल. यामध्ये जुना पासवर्ड टाकून तुम्हाला नवीन पासवर्ड बनवावा लागेल.
  • New Application वरती क्लिक करा.
  • Section A :
    • आपले राज्य,जिल्हा,तालुका,गाव,वस्ती निवडा.
  • Section B : वैयक्तिक माहिती.
    • आधार कार्डनुसार नाव.
    • आधार कार्ड नंबर भरा.
    • Verify Aadhaar Number वरती क्लिक करा.
    • वडिलांचे नाव,APL/BPL,Sub Category,मोबाईल नंबर,ई-मेल,पत्ता इ.माहिती भरा.
  • Section C : बँकेची माहिती
    • सर्वात आधी IFSC कोड भरा, पासबुक वरील नाव, बँकेची शाखा/पत्ता,खाते नंबर भरा.
  • Scans/स्कॅन केलेले बँक पासबुक अपलोड करा.
  • Apply बटन वरती क्लिक करा.
  • आपल्याला एक Application नंबर मिळेल. हा नंबर लिहून घ्या किंवा प्रिंट करून ठेवा.
  • Application नंबर वरून आपण केलेल्या अर्जाची सद्यस्थिती तपासू शकतो.

अर्जाचे स्टेटस पाहण्यासाठी View Application पर्यायावर क्लिक करा. आपण केलेला अर्ज (swachh bharat mission gramin toilet online apply) इथे पाहायला मिळेल. Track Status वरती क्लिक करा इथे तुम्हाला अर्जाची संपूर्ण माहिती पहायला मिळेल.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *