घरपट्टी,पाणीपट्टी कर मोबाईलवरून भरता येणार : Gram Panchayat Tax Payment
property tax payment online : ग्रामपंचायत मधील अनेक सुविधा या ऑनलाईन होत आहेत. ग्रामपंचायत दाखले, उतारे हे मोबाईल वरून मागणी करता येणार आहे. अशा अनेक सुविधा या ऑनलाईन होत आहेत.
Gram Panchayat Tax Payment
महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत पेपरलेस होणार आहेत. आपल्याला जर घरपट्टी, पाणीपट्टी, इमारतीवरील कर, पडसर कर, आरोग्य कर, दिवाबत्ती कर, हे भरण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जावे लागत असे. परंतु आता आपण मोबाईल वरून काही मिनिटातच हे कर ऑनलाईन भरू शकतो.
घरपट्टी कर, पाणी पट्टी कर हे ऑनलाईन भरल्यामुळे नागरिकांचा यामध्ये खूप वेळ वाचणार आहे.
आपल्यावेळेनुसार कर भरता येईल. त्याचबरोबर इतर सुविधाचा सुद्धा लाभ घेता येणार आहे.नागरिकांनी “mahaegram citizen connect”ॲप मोबाईल मध्ये प्ले स्टोर वरून घ्यायचे आहे.
त्याचबरोबर ग्रामपंचायत संबधित इतर महत्वपूर्ण दाखले, उतारे हे सुद्धा ऑनलाईन मिळतील. काही ग्रामपंचायत मध्ये हि सुविधा सुरु झाली असून नागरिक या सुविधेचा लाभ घेत आहेत. यामुळे ग्रामपंचायत मध्ये जाण्याची गरज नाही.
mahaegram citizen connect maharashtra
mahaegram citizen connect – वेबसाईट (mahaegram.co.in/) च्या माध्यमातून ग्रामपंचायत संबधित संपूर्ण माहिती नागरिकांना मिळणार आहे. म्हणजेच ग्रामपंचायत मधील सर्वसाधारण सुविधा, ग्रामपंचायत मध्ये राबविले जाणारे नाविन्यपूर्ण उपक्रम, ग्रामपंचायत मार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधा याची सुद्धा माहिती हि ऑनलाईन मिळेल.
You can pay tax online through mahaegram citizen connect.
Please send link to pay grampanchayat tax