सिटी सर्व्हे म्हणजे काय : City Survey Online
City Survey Online : सिटी सर्व्हे उतारा हा आपल्याला अनेकदा गृह कर्ज किंवा इतर कर्ज प्रकरणासाठी लागतो. सिटी सर्व्हे म्हणजे नक्की काय? हा उतारा आपण ऑनलाईन कसा काढायचा याची सविस्तर माहिती याठिकाणी उपलब्ध आहे.
City Survey Online
सिटी सर्व्हे उतारा म्हणजेच आपल्या घराचा जागेचा उतारा होय. परंतु ग्रामपंचायत मधून मिळणारा घराचा उतारा हा वेगळा आहे. आणि सिटी सर्व्हे जागेचा उतारा वेगळा आहे. “city survey number online” सिटी सर्व्हे उतारा काढण्यासाठी नागरिकांना जागेचा “सिटी सर्व्हे नंबर” माहिती असणे गरजेचे आहे.
नागरिकांना जर सिटी सर्व्हे नंबर माहिती नसेल तर ऑनलाईन मोबाईल वरून काही मिनिटामध्ये हा नंबर शोधू शकता. यासाठी नागरिकांना कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही.
सिटी सर्व्हे उतारा माहिती मराठी
- सिटी सर्व्हे उतारा काढण्यासाठी नागरिकांना भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जाऊन त्याठिकाणी अर्ज करावा लागत होता.
- परंतु आता शासनाने जमिनी संदर्भातील सर्व कागदपत्रे हि ऑनलाईन केलेली आहेत. अजून काही जिल्ह्यामध्ये हि सुविधा सुरु झालेली नाही.
- घराचे जागेचे उतारे, शेत जमिनीचे ७/१२ उतारे, नकाशे, फेरफार, ग्रामपंचायत मार्फत मिळणारे दाखले उतारे इ. नागरिकांना शासनाने ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे नागरिकांचा होणारा खर्च आणि वेळ दोन्हीची बचत होणार आहे.
(City Survey Number) सिटी सर्व्हे नंबर कसा काढायचा?
- शासनाने सिटी सर्व्हे नंबर काढण्यासाठी नवीन पोर्टल सुरु केले आहे. अजून त्यावरती काम सुरु आहे, यामुळे नागरिकांना त्या पोर्टल वरती आता सिटी सर्व्हे नंबर “Find CTS Number ” पाहता येणार नाही.”City Survey Online“
- परंतु आपण https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या साईटवरून आपण मालमत्ता पत्रक या पर्यायाचा वापर करून नंबर शोधू शकता.
सिटी नंबर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
सिटी सर्व्हे उतारा म्हणजेच आपल्या जागेचे “Property Card” मालमत्ता पत्रक होय. मोबाईल वरून आपण काही मिनिटामध्ये हे पत्रक/उतारा काढू शकता. सिटी सर्व्हे नंबर म्हणजे नगर भूमापन क्रमांक होय.
सिटी सर्व्हे नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा?
मित्रांनो “सिटी सर्वे नकाशा” अजून ऑनलाईन झालेले नाहीत? यामुळे जर आपल्याला सिटी सर्वे नकाशा पहायचा असेल तर भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जावूनच नकाशा काढावा लागेल.
city survey number online mumbai, city survey number online pune, city survey property card online, land survey map online