आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे पहा : Aadhar card mobile number check

Aadhar card mobile number check

Aadhar card mobile number check : आधार कार्ड वरील पत्ता बदलणे किंवा ऑनलाईन शासकीय योजनेचे अर्ज भरणे, शैक्षणिक अर्ज भरणे इतर कामासाठी अनेकदा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तरच आपल्याला फॉर्म भरता येतो.

या लेखामध्ये काय आहे?

Aadhar card mobile number check

आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर आपण मोबाईल वरून आधार कार्ड डाउनलोड करू शकता, तसेच आधार कार्ड हरवले तर मोबाईल वरती फक्त काही मिनिटामध्ये आधार कार्डची इ-कॉपी काढू शकता.

अनेक ठिकाणी आपल्याला आधार कार्ड मागितले जाते, आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे असे कागदपत्रे आहे. बँकेत खाते उघडणे, PAN कार्ड काढणे, मतदार नोंदणी करणे इतर योजनेचा लाभ घेण्यासाठी सुद्धा आधार कार्ड लागते. आधार कार्डला “Aadhar card mobile number check” कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे चेक कसे करायचे याबद्दल संपूर्ण माहिती या लेखामध्ये सविस्तर देण्यात आली आहे. आपण खालील स्टेप फॉलो करून आपल्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे चेक करू शकता.

Mobile number linked with aadhar

आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर आहे हे आपण वेबसाईट वरून किंवा अँप्लिकेशन द्वारे सुद्धा चेक करू शकता. वेबसाईट वरून आपण चेक करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

आधारला जर मोबाईल नंबर लिंक असेल तर आपण मोबाईलवरून आधार कार्डवरील पत्ता बदलू शकता. त्याचबरोबर आधार कार्ड कोणत्या बँकेत लिंक आहे हे सुद्धा चेक करता येईल.

  • सर्वप्रथम मोबाईलमध्ये https://myaadhaar.uidai.gov.in/check-aadhaar-validity हि साईट ओपन करावी.
  • त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर व समोरील चौकोनातील कॅप्चा कोड टाकून प्रोसिड/Proceed बटन वरती क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याचे शेवटचे ३ अंक पाहायला मिळतील.
  • संपूर्ण मोबाईल नंबर त्याठिकाणी दाखवणार नाही परंतु शेवटचे ३ अंक तुम्हाला दाखवेल.
  • आधार कार्ड अपडेट करण्याची गरज असेल तर त्याठिकाणी तसा मेसेज दिसेल.

आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करायचा असल्यास आपण आधार सेंटरला जावून मोबाईल नंबर लिंक करू शकता, मोबाईल वरून आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करता येत नाही.

Similar Posts

One Comment

  1. मला नवीन रॅशन कार्ड बनवचे आहे तरी मला शकऱ्या करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *