कुक्कुटपालन योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म सुरु; Kukut Palan Yojana Online Form
Kukut Palan Yojana Online Form : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी, पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन कडून नाविन्यपूर्ण योजना व राज्यस्तरीय योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहे. योजनेतून पात्र लाभार्थीला १००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपनासाठी व्यवसाय सुरु करण्यासाठी ७५% पर्यंत अनुदान मिळणार आहे.
Kukut Palan Yojana Online Form
कुक्कुट पालन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शासनाने ऑनलाईन पोर्टल तसेच मोबाईल अँप्लिकेशन सुविधा उपलब्ध करून करून दिली आहे. सदर योजना सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात मुंबई उपनगरे व मुंबई या जिल्ह्यामध्ये राबिविली जाणार नाही. सदर योजनेसाठी ३०% लाभार्थी महिलांना तसेच ३% विकलांग लाभार्थींना प्राधान्य असणार आहे.
सदर योजनेसाठी अनुसूचित जाती (SC)/अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील लाभार्थींना ७५% पर्यंत अनुदान दिले जाते, लाभार्थीला २५% स्वहीस्सा भरावा लागणार आहे, तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थींना ५०% पर्यंत अनुदान दिले जाते व ५०% लाभार्थीला स्वहीस्सा भरावा लागेल.
योजनेचे नाव | नाविन्यपूर्ण योजना २०२३ |
योजनेतून मिळणारा लाभ | १००० कुक्कुट पालन पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरु करण्यासाठी अनुदान |
अर्ज सुरु दिनांक | ०९/११/२०२३ |
अंतिम दिनांक | ०८/१२/२०२३ |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
योजनेची अधिकृत साईट | https://ah.mahabms.com/ |
कुक्कुटपालन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड
- बँक खाते पुस्तक
- ७/१२, ८अ
- रहिवाशी दाखला
- रेशन कार्ड
- ७/१२ मध्ये लाभार्थीचे नाव नसेल तर कुटुंबातील व्यक्तींचे संमती पत्र किंवा दुसऱ्याची जमीन भाडे तत्वावर करारनामा
- लाभार्थी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र
- दिव्यांग असल्यास दाखला
- अपत्य दाखला
- शैक्षणिक पात्रतेचा दाखला
- दारिद्र्य रेषेखालील असल्यास दाखला
- शेळी मेंढी पालनाचे प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्र
Navinya purna Yojana 2023
खालील योजनांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत ०८/१२/२०२३ पर्यंत आहे.
राज्यस्तरीय योजना | जिल्हास्तरीय योजना |
---|---|
दुधाळ गाई/म्हशीचे वाटप करणे | शेळी/मेंढी गट वाटप करणे |
१००० मांसल कुक्कुट पालन पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरु करणे | दुधाळ/गाई म्हशीचे वाटप करणे |
शेळी/मेंढी गट वाटप करणे | तलंगा वाटप करणे |
– | एक दिवशीय सुधारित पक्षांच्या पिल्लाचे गट वाटप करणे |