आधार कार्ड संबंधित अत्यंत महत्वपूर्ण माहिती पहा | Aadhar Card limit

Aadhaar Card limit

Aadhar Card limit : आधार कार्ड हे प्रत्येक ठिकाणी लागणारे अत्यंत महत्त्वाचे असे कागदपत्र आहे.

आधार कार्ड बँक, रेशन कार्ड, तसेच पॅन कार्ड इतर बऱ्याच ठिकाणी जोडलेले/लिंक आहे, तसेच आता मतदान कार्डलासुद्धा आधार कार्ड लिंक करायचे आहे.

आधारकार्ड संबंधित खाली दिलेली माहिती प्रत्येक व्यक्तीला माहिती असणे गरजेचे आहे जर माहिती नसेल तर ते आपण माहिती करून घ्यावी जेणेकरून तुम्हाला नंतर पश्चाताप होणार नाही.“Aadhar Card limit

[Aadhaar Card limit] संबंधित अत्यंत महत्त्वाची माहिती.

आपण बऱ्याचदा पाहतो की काहीजणांच्या आधार कार्ड वरील नाव, जन्मतारीख किंवा पत्ता Gender हे चुकीचे झालेले असते, त्यामुळे त्यांना बँकेत किंवा इतर कामात अडचणी येतात.

ते दुरुस्त करण्यास आधार केंद्रावर घेऊन जातात. आणि ते दुरुस्त करून घेतात. पण त्यांना आधार संबधित सर्वात महत्त्वाची अशी माहिती नसते यामुळे त्यांना नंतर खूप त्रास सहन करावा लागतो.

आधारकार्ड दुरुस्त करण्यापूर्वी आपल्या इतर कागदपत्रावरील नाव (स्पेलिंग), जन्म तारीख, हे एकसमान आहे का पाहूनच त्यानुसारच आधारकार्ड दुरुस्त केले पाहिजे. यामुळे तुम्हाला पुन्हा आधार कार्ड दुरुस्त करावे लागणार नाही. आणि आधार दुरुस्ती करण्याची मर्यादा ओलांडली जाणार नाही.

आधार दुरुस्त करण्यासाठी नाव, जन्मतारीख, पत्ता, Gender इत्यादीसाठी मध्ये काही बदल करायचा असल्यास यासाठी मर्यादा आहेत. तुम्हाला त्या माहीत असणे आवश्यक आहे.

Aadhar Card limit” आधार कार्ड वरील दुरुस्ती किती वेळा करू शकता?

दुरुस्तीमर्यादा
नावजास्तीत जास्त २ वेळेस
जन्मतारीख१ वेळा
पत्तामर्यादा नाही (कितीही वेळा)
Gender१ वेळा
Aadhar Card limit
  • प्रत्येक आधारकार्ड धारकाला वरील माहिती असणे आवश्यक आहे. यामुळे पुढे अडचणी येणार नाही.(हे हि वाचा : ग्रामपंचायत योजना यादी पहा)
  • बरेच जण एखाद्या ठिकाणी वय बसत नसेल किंवा इतर कारणाने दुरुस्त करीत आहेत. परंतु –
  • एकदा लिमिट पूर्ण झाल्यानंतर पुन्हा बदल करायचा असेल तर आधार केंद्राद्वारे करता येत नाही.
UIDAI प्रादेशिक कार्यालयाला भेट देऊन, आधार कार्डवरील Gender, जन्मतारीख, नाव अपग्रेड करण्यासाठी एका विशिष्ट मर्यादे पलीकडे बदल करणे शक्य आहे.

आपल्याला जर माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा.

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *