CIBIL स्कोर मोफत चेक करा मोबाईलवरून : free cibil score check
free cibil score check : बँकेकडे आपण कर्ज घेण्यासाठी गेल्यानंतर त्याठिकाणी आपल्याला सिबिल स्कोर विचारला जातो. सिबिल स्कोर रिपोर्ट वरती आपण पूर्वी घेतलेले कर्जाचा संपूर्ण तपशील, कर्ज खाते, आपण वेळेवर हप्ते भरले का? याची संपूर्ण माहिती सिबिल स्कोर रिपोर्टमध्ये असते.
Free CIBIL Score Check
आपल्याला “my cibil score” मोबाईल वरून किंवा आपले सरकार सेवा केंद्र, ऑनलाईन सुविधा केंद्र याठिकाणी जाऊन सिबिल स्कोर चेक करता येईल. परंतु येथे आम्ही तुम्हाला मोबाईल वरून मोफत/फ्री सिबिल स्कोर कसा चेक (CIBIL Score Checking) करायचा याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती देणार आहोत.
अनेक बँकांनी सिबिल स्कोर चेक करण्यासाठी ग्राहकांना मोबाईल मध्ये बँकिंग अँप मध्ये हि सुविधा दिलेली आहे. त्यामध्ये PAN कार्ड नंबर आणि नाव टाकल्यानंतर आपला सिबिल स्कोर रिपोर्ट काही मिनिटातच मोबाईल वरती पाहायला मिळेल.
Credit Score Check Free
आपण जर गुगल पे “Google Pay” वापरत असाल तर गुगल पे वरून आपण सिबिल स्कोर मोफत चेक करू शकता, तसेच बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकिंग अँप मधून सुद्धा आपण सिबिल स्कोर चेक करू शकता.
गुगल पे वरून सिबिल स्कोर चेक करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.
- सर्वप्रथम गुगल प्लेस्टोअर वरून आपले गुगल पे अँप अपडेट करून घ्या.
- अँप ओपन करा.
- बँक खात्यातील शिल्लक तुम्हाला Check Bank Balance या ऑप्शन च्या वरती Check Your CIBIL Score for free हा ऑप्शन दिसेल.
- Check Your CIBIL Score for free वरती क्लिक करा.
- नंतर Lets Check वरती क्लिक करा. त्यानंतर PAN कार्ड वरील स्वतःचे नाव व आडनाव टाका.
- पुढे प्रोसेस करा काही सेकंदातच आपला सिबिल स्कोर तुम्हाला पाहायला मिळेल.
सिबिल स्कोर मध्ये आपण सुरुवातीपासून आता पर्यंत आपण जेवढे कर्ज घेतले त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल.
सिबिल स्कोर जर चांगला असेल तर तुम्हाला कोणत्याही बँकेकडून कर्ज घेण्यास अडचण येणार नाही.
Cbl chek
Nice information