माझी लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज सुरु येथून अर्ज करा : Majhi Ladki Bahin Yojana Online Apply

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

Majhi Ladki Bahin Yojana Online Apply : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत, लाभार्थी महिलांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज कुठे करायचा तसेच ऑनलाईन फॉर्म कसा या बद्दल सविस्तर येथे दिलेली आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून लाभार्थी महिलांना मोबाईल अँपद्वारे ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे, शासनाकडून महिलांसाठी विविध योजना राबविल्या जातात, आता शासनाकडून राज्यातील योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. अर्ज भरण्यासाठी आवश्यक असणार सर्व कागदपत्रे लाभार्थीने मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवावी.

शासनाने अर्ज करण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. अर्जदार लाभार्थी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केद्र किंवा ऑनलाईन सुविधा केंद्र द्वारे करू शकतात. तसेच ऑफलाईन अर्ज ग्रामपंचायत, अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये येथे ऑफलाईन अर्ज करू शकतात.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कागदपत्रे व माहिती

  • लाभार्थीचे आधार कार्ड
  • बँक खाते पासबुक
  • रेशन कार्ड
  • एक पासपोर्ट आकाराचा फोटो
  • उत्पन दाखला नसेल तर केशरी/पिवळे रेशन कार्ड
  • डोमासाईल नसेल तर १५ वर्षापूर्वीचे १) रेशन कार्ड २) जन्म दाखला ३) मतदार ओळखपत्र ४) शाळा सोडल्याचा दाखला (यापैकी कोणतेही १)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज कसा भरायचा?

लाभार्थींना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शासनाने नारीशक्ती दूत या अँप द्वारे ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

  • ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सर्व प्रथम मोबाईल मध्ये नारीशक्ती दूत हे अँप हे प्ले स्टोर वरून घ्यावे.
  • अँप डाऊनलोड झाल्यानंतर ओपन करावे, त्यानंतर तुम्हाला Skip हे बटन दिसेल त्यावरती क्लिक करा.
  • आपल्याला मोबाईल नंबर टाकण्यासाठी एक चौकोन दिसेल त्य्मध्ये आपला मोबाईल नंबर त्कौन accept term & समोरील चौकोनात क्लिक करून Login बटन वरती क्लिक करा.
  • मोबाईल नंबर वरती एक ४ अंकी ओटीपी येईल तो व्हेरीफाय करून घ्यावा. त्यानंतर आपण अँप मध्ये लॉग इन व्हाल.
  • सर्व प्रथम तुम्हाला प्रोफाईल अपडेट करण्यास सांगितले जाईल. सर्वप्रथम प्रोफाईल अपडेट करून घ्यावी.
  • प्रोफाईल अपडेट करताना संपूर्ण नाव, ई-मेल, जिल्हा, तालुका व गाव इ. माहिती भरावी.
  • त्यानंतर नारीशक्ती प्रकार या पर्यायामधून आपण सामान्य महिला अर्जदार असाल तर सामान्य महिला हा पर्याय निवडून अपडेट बटन वरती क्लिक करा.
  • आपली प्रोफाईल अपडेट होईल. त्यानंतर होम-नारीशक्ती दूत या वरती क्लिक करा. त्या ठिकाणी तुम्हाला खालील प्रमाणे माहिती दिसेल.
majhi ladki bahin yojana gov in
narishakti doot app
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना या पर्यायावर क्लिक करा
  • त्यांनतर परमिशन Allow करा, आपल्या समोर योजनेचा अर्ज भरण्यासाठी फॉर्म ओपन होईल.
  • फॉर्म मध्ये अर्जदाराची संपूर्ण माहिती भरावी, तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.

सर्व माहिती अचूक भरून आपण फॉर्म सबमिट करू शकता, अधिक माहितीसाठी आपला whatsapp ग्रुप जॉईन करा.

Similar Posts

2 Comments

  1. मतदान कार्डआधार कार्ड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *