या महिलांना मिळणार 1500 रुपये महिना : Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : महिलांसाठी आनंदाची बातमी महिलांना शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात, शुक्रवार २८ जून २०२४ रोजी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला, यामध्ये त्यांनी महिलांसाठी विविध घोषणा केल्या आहेत, या लेखामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
राज्यातील महिलांसाठी शासनातर्फे दर महिन्याला १५०० रुपये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतून देण्यात येतील अशी घोषणा अर्थ संकल्पामध्ये करण्यात आली. राज्यामधील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिला लाभार्थींना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमधून १५०० देण्यात येतील असे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार घोषणा केली. राज्यातील महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी आरोग्य व पोषण सुधारण्यासाठी राज्य सरकारची महत्वपूर्ण अशी योजना आहे. घरकुल योजनेची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना |
योजना | महाराष्ट्र |
लाभार्थी | राज्यातील महिला |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
योजनेची अंमलबजावणी | जुलै २०२४ पासून |
शासन निर्णय | पहा |
महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी हि योजना सुरु केली आहे. २१ ते ६५ वयोगटातील निराधार महिला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिला, विधवा, घटस्पोटीत महिला इ. दरमहा १५०० रुपये मिळणार आहे. “Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana” यासाठी दरवर्षी ४६००० कोटी ची तरतूद करण्यात येणार आहे. या योजनेची सुरुवात जुलै २०२४ पासून होईल. पात्र लाभार्थी महिलेच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना 2024 – पात्रता
- लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे गरजेचे आहे.
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिला
- राज्यातील विवाहित, परित्यक्त्या, विधवा, निराधार महिला
- लाभ घेण्यासाठी कौटुंबिक उत्पन्न २,५०,००० रु. पेक्षा कमी असावे.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे बँक खाते पासबुक असणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कागदपत्रे (majhi ladki bahin yojana documents in marathi)
- लाभार्थ्याचे आधार कार्ड
- बँक खाते पासबुक
- रेशन कार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- योजनेचे अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
- उत्पन दाखला (सक्षम प्राधिकारी) (रु.२.५० लाख पर्यंत) नसेल तर केसरी/पिवळे रेशन कार्ड आवश्यक
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर १५ वर्षापूर्वीचे १) रेशन कार्ड २) जन्म दाखला ३) मतदार ओळखपत्र ४)शाळा सोडल्याचा दाखला
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे वरील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
Majhi Ladki Bahin Yojana Online Apply
लाभार्थींना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, लाभार्थींना ऑनलाईन वेबसाईट तसेच App द्वारे ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे किंवा आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र येथे जाऊन लाभार्थी आपला अर्ज ऑनलाईन भरू शकतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीकडे वरील सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
Mukhyamantri Ladli Bahin Yojana