job card list 2026; ग्रामपंचायत जॉब कार्ड लिस्ट येथून काढा
job card list 2026 : जॉब कार्ड हे रोजगार हमी योजेनेचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपल्याकडे जॉब कार्ड असणे गरजेचे आहे. तसेच जॉब कार्ड चा “job card list 2026” घरकुल, फळबाग लागवड, तसेच ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जॉब कार्डचा उपयोग होतो.
आपण आपल्या गावची जॉब कार्ड यादी कशी काढायची? यादीत आपले नसेल तर काय करावे? सविस्तर माहितीसाठी लेख संपूर्ण वाचा.
जॉब कार्ड यादी कशी काढावी?
- सर्व प्रथम गुगल वरती mgnrega job card list असे टाईप करून सर्च करा.
- Gram Panchayats – nrega या पर्यायावर क्लिक करा.
- किंवा लिंक – https://nrega.dord.gov.in/stHome.aspx
- वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुमच्या समोर संपूर्ण राज्याची यादी दिसेल. त्यामधून आपले राज्य (job card maharashtra online) निवडा.
- जिल्ह्याची यादी पाहायला मिळेल त्यामधून आपला District : जिल्हा निवडा.
- Block : तालुका/तहसिल निवडा
- Panchayat : पंचायत/गाव निवडा
- Proceed बटन वरती क्लिक करा आपल्या समोर निवडलेल्या ग्रामपंचायतचा संपूर्ण रिपोर्ट पहायला मिळेल.
| R1 | Job Card/Registration |
| R2 | Demand Allocation and Musteroll |
| R3 | Work |
| R4 | Irregularties/Analysis |
| R5 | IPPE |
| R6 | Registers |
- अशाप्रकारे पर्याय असतील, आपल्याला जॉब कार्ड लिस्ट पाहायची आहे. म्हणून आपण वरील पर्यायांपैकी R5 : IPPE मध्ये Application Register वरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर त्या ग्रामपंचायत अंतर्गत संपूर्ण जॉब कार्ड धारकांची यादी पाहायला मिळेल.
Job Card List
आपण निवडलेल्या ग्रामपंचायतमध्ये (job card list maharashtra) एकूण किती कुटुंबाची जॉब कार्ड साठी नोंदणी झाली आहे. याची यादी ओपन होईल. या यादी मध्ये आपले नाव तपासू शकता. जर आपले नाव यादी मध्ये नसेल तर आपल्याला जॉब कार्ड साठी अर्ज करावा लागेल यासाठी आपल्याकडे रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, ४”x६” साईजचे २ फोटो, फॉर्म नमुना नं. १ भरून तसेच आवश्यक कागदपत्रे जोडून ग्रामपंचायत कडे जॉब कार्डसाठी (job card maharashtra gram panchayat) अर्ज करू शकता.

Pinparkhed
Jab card घरकुल योजना
Job card