१ रुपयामध्ये पिक विमा ऑनलाईन फॉर्म सुरु; Pik Vima Online Form 2024

Pik Vima Online Form 2023

Pik Vima Online Form : शेतकऱ्यांना १ रुपयामध्ये पिक विमा भरता येणार आहे. योजनेचा लाभ कसा घ्यायचा? अर्ज कुठे करायचा? आणि फॉर्म भरण्यासाठी “Pik Vima Online Form” कोणती कागदपत्रे लागतात. याबद्दल संपूर्ण माहिती या लेखात दिलेली आहे.

Pik Vima Online Form

प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना फक्त एक रुपयामध्ये पिकाचा विमा भरता येणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना मोबाईलवरून सुद्धा पिक विमा करिता अर्ज करता येणार आहे. तसेच ऑनलाईन सुविधा केंद्रावरती शेतकऱ्यांना पिक विम्यासाठी फॉर्म भरता येईल.

या योजनेला सर्वसमावेशक पिक विमा योजना असे देखील म्हटले जाते. नैसर्गिक आपत्ती तसेच इतर काही कारणामुळे बऱ्याचदा पिकाचे नुकसान होते. परंतु शेतकऱ्याने जर पिकाचा विमा उतरविला/केला असेल तर शेतकऱ्याला संबंधित विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळू शकते. १ रुपयामध्ये पिक विमा “1 rs pik vima online apply” योजनेमुळे शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेणे अधिक सोपे झाले आहे. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

Pik Vima Online Application Maharashtra

१ रुपयामध्ये पिक विमा भरण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना ऑनलाईन मोबाईल वरून अर्ज करता येणार आहे. तसेच सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर), महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा सेवा केंद्र याठिकाणी जावून शेतकऱ्यांना अर्ज भरता येणार आहे.

खरीप हंगाम व रब्बी हंगामासाठी पिक विमा योजना राबविली जाते, खरीप हंगाम व रब्बी हंगाम मध्ये पिक विमा योजनेचे फॉर्म सुरु होतात. पिक विमा योजनेचे अर्ज सुरु झाल्यानंतर शेतकऱ्याने दिलेल्या कालावधीमध्ये आपला विमा अर्ज भरणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना आता 1 रुपयांमध्ये पिक विमा भरता येणार आहे, शासनाने शेतकऱ्यांसाठी हि योजना सुरु केली आहे. पिक विमा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे शेतकऱ्याकडे असायला हवी.

Pik Vima Documents (पिक विमा कागदपत्रे)

पिक विम्यासाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे

  • आधार कार्ड
  • बँक खाते पुस्तक
  • शेतजमिनीचा ७/१२ उतारा
  • पीकपेरा
  • मोबाईल नंबर

शेतकऱ्याकडे “पिक विमा कागदपत्रे” असणे गरजेचे आहे. तसेच शेतकरी https://pmfby.gov.in/ या साईट वरती १ रुपयामध्ये पिक विम्यासाठी अर्ज करू शकतात.

Similar Posts

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *