Job card registration maharashtra : नवीन जॉब कार्ड कसे काढायचे पहा संपूर्ण माहिती
Job card registration maharashtra : नमस्कार मित्रांनो आपल्याला जर महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याकडे “mahatma gandhi nrega” जॉब कार्ड (Job Card) असणे गरजेचे आहे.
जॉब कार्ड काय आहे? (Job card online registration)
जॉब कार्ड “Job Card” हे ग्राम पंचायत मार्फत दिले जाते. हे जॉब कार्ड महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत दिले जाते. जॉब कार्ड चे खूप फायदे आहेत. आपल्याला जर घरकुल, गायगोठा शेड, फळबाग लागवड, नवीन विहीर इ. योजनांचा लाभ घेण्यासाठी जॉब कार्ड चा उपयोग होतो.(ग्रामपंचायत योजनांची यादी पहा)
जॉब कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे/माहिती.
अ.क्र. | कागदपत्रे |
---|---|
१) | आधार कार्ड छायांकित प्रत |
२) | बँक पासबुक छायांकित प्रत |
३) | रेशन कार्ड छायांकित प्रत |
४) | विहित नमुन्यातील अर्ज (नमुना नं.१) |
५) | ४X६ साईज २ फोटो (एकत्रित) |
६) | मोबाईल नंबर |
७) | फॉर्म पाहण्यासाठी – येथे क्लिक करा. |
८) | फॉर्म पास+वर्ड – Admin@123 |
जॉब कार्ड {online job card apply} काढण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.
- विहित नमुन्यातील अर्ज भरायचा आहे.
- त्यासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडावी.
- कुटुंबातील वय वर्षे १८ पुढील व्यक्तींची नाव नोंदणी करता येईल.
- कुटुंबातील सदस्य ४X६ साईज ग्रुप फोटो जोडावा.
- फॉर्म व्यवस्थित भरून फॉर्म तपासून ग्रामपंचायत कडे जमा करावा.
- ग्राम पंचायत कडून आपणांस अर्जाची “nrega job card” पोहच पावती दिली जाईल.
अर्ज दिल्यानंतर काही दिवसातच अर्जाची ऑनलाईन नोंदणी केली जाईल. आणि आपले नाव जॉब कार्ड यादीमध्ये “job card registration” समाविष्ट केले जाईल.
जॉब कार्ड यादीत नाव पाहण्यासाठी - येथे क्लिक करा.
yes