शिलाई मशीन योजना ९०% अनुदान मिळणार अर्ज सुरु : Silai Machine Yojana

Silai machine yojana maharashtra : शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सुरु झाले असून योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा? अनुदान किती मिळणार? कोणत्या महिलांना अर्ज करता येणार? व पात्रता काय असणार? आणि योजना कोणत्या जिल्ह्यासाठी सुरु झाली? याबद्दल संपूर्ण माहिती येथे दिलेली आहे.
Silai Machine Yojana
शासनाकडून महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी अनेक शासकीय योजना राबविल्या जातात. ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या महिलांसाठी हि योजना सुरु झाली असून, जालना जिल्ह्यामध्ये हि योजना सध्या सुरु आहे. इतर जिल्ह्यामध्ये योजना सुरु झाल्यानंतर सविस्तर माहिती दिली जाईल. यासाठी पात्र लाभार्थी महिलेचे वय हे किमान १८ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या महिलांना विविध साहित्य पुरविणे या योजने अंतर्गत शिलाई मशीन घटकाचा लाभ दिला जाणार आहे. सदर योजना आता जालना जिल्ह्यासाठी सुरु झाली असून, अर्ज भरणे सुरु आहेत. दि. १ जुलै २०२५ पासून योजनेसाठी अर्ज सुरु झालेले असून अर्ज करण्याची अंतिम मुदत (Silai machine yojana last date 2025) ३० जुलै २०२५ असणार आहे. यामुळे अर्जदार महिलांनी विहित कालावधीमध्ये अर्ज भरणे आवश्यक आहे.
योजनेचे नाव | शिलाई मशीन अनुदान योजना |
लाभार्थी | अनुसूचित प्रवर्गातील महिला |
अधिकृत जाहिरात | पहा |
अर्ज सुरु दिनांक | १ जुलै २०२५ |
अंतिम दिनांक | ३० जुलै २०२५ |
अनुदान किती असेल? | ९०% अनुदान |
Silai Machin Anudan Yojana Eligibility
- शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय किमान १८ वर्षे असावे.
- अर्जदार महिला अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे १२०००० रुपये पेक्षा जास्त नसावे.
- लाभार्थी कुटुंबाकडे शौचालय असणे आवश्यक आहे.
- कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय/निमशासकीय सेवेत तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम’पंचायत सदस्य नसावा
शिलाई मशीन योजना कागदपत्रे-Silai Machine Yoajana Documents
- अर्जदार महिलेचे आधार कार्ड झेरॉक्स
- आधार लिंक बँक खाते पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- जात प्रमाणपत्र
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- वय वर्षे १८ पूर्ण असल्याबाबत पुरावा (आधार कार्ड, शाळेचा दाखला, मतदान कार्ड)
- शिलाई मशीनचे प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्र (असेल तर)
- यापूर्वी लाभ न घेतल्याचे घोषणापत्र
Parbhani district sathi nahi ka