या जिल्ह्यासाठी महा ई सेवा केंद्रासाठी ऑनलाईन अर्ज सुरु | Maha e Seva Kendra Registration 2022
Maha e seva kendra registration 2022 : आजच्या लेखात आपण आपले सरकार सेवा केंद्र/महा ई सेवा केंद्र या एका जिल्ह्या करिता ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत.
तर हे अर्ज कोणत्या जिल्ह्यात सुरु झाले आहेत. त्याच्यासाठी पात्रता काय आहे. अर्ज सुरु झाल्याची तारीख तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख, अटी व शर्ती,आवश्यक कागदपत्रे इ.बद्दल आपण सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत. जाणून घ्या संपूर्ण माहिती.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय इ-गव्हर्नंस कृती कार्यक्रमा अंतर्गत राज्यामधील ग्रामीण तसेच नागरी भागात नागरिकांपर्यंत शासकीय, निमशासकीय आणि खाजगी सेवा पोहोचविण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र वर्धा जिल्ह्यात मंजूर करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांची कामे हि कमी वेळेत होतील आणि धावपळ करावी लागणार नाही.(ग्रामपंचायत योजनांची यादी पहा)
आपले सरकार सेवा केंद्र माहिती सविस्तर तक्ता.
अ.क्र. | तपशील | Ans. |
१) | कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज सुरु आहेत? | वर्धा |
२) | आपले सरकार सेवा केंद्र जागा किती आहेत? | ६६४ |
३) | अर्ज सुरु झालेली तारीख | १३ जून २०२२ |
४) | अर्ज करण्याची अंतिम तारीख | २१ जून २०२२ |
५) | अर्ज करण्याचा प्रकार | ऑनलाईन |
६) | वर्धा जिल्ह्याचे अधिकृत संकेस्थळ | येथे क्लिक करा |
७) | अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
८) | प्रेसनोट | येथे क्लिक करा |
अटी व शर्ती
- अर्जदार फक्त एकाच केंद्रासाठी अर्ज करू शकतात.(घराचा उतारा ऑनलाईन काढा घरबसल्या)
- आपले सरकार सेवा केंद्र ज्याठिकाणी घ्यायचे/मंजूर करायचे आहे, अर्जदार त्याच ठिकाणचा/गावचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराच्या कुटुंबात यापूर्वी आपले सरकार सेवा केंद्र मंजूर नसावे.
- अर्जदार कंत्राटी कर्मचारी, शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी नसावा.
- अर्जदाराकडे CSC किंवा इतर डिजिटल सेवा केंद्र चालक असेल तर त्यास प्राधान्य देण्यात येईल.(आयुष्मान भारत योजना आपल्या गावची यादी काढा)
- शासकीय नियमाप्रमाणे अधिसूचित आरक्षण लागू असेल.(महिला ३३% ,अपंग ५%)
- अर्जाचे कागदपत्रे अपलोड करताना JPG,JPEG, किंवा PDF स्वरुपात असावी तसेच त्याचा आकार १ MB पेक्षा जास्त नसावा.
- महाराष्ट्र शासन (सा.प्र.वि.) यांचे शासन निर्णय क्रमांक. मातस-१७१६/प्र.क्र.५१७/३९ दिनांक १९.०१.२०१८
पात्रता.
- १२ वी पास असणे आवश्यक आहे.
- MS-CIT किंवा इतर शासन मान्य संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
आवश्यक कागदपत्रे/माहिती
- PAN कार्ड
- आधार कार्ड
- मतदान कार्ड(घरावरील सोलर योजना अर्ज माहिती)
- डोमिसाईल प्रमाणपत्र
- १२ वी चे बोर्ड प्रमाणपत्र
- MS-CIT प्रमाणपत्र/इतर शासन मान्य संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
- लाईटबिल
- CSC आय डी असल्यास मागील ६ महिन्याचे CSC B2C व्यवहार अहवाल.