विधानसभा निवडणूक निकाल असा पहा मोबाईलवर : Vidhan sabha election result
राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक झाली असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी निकाल जाहीर होणार आहे. कुठे कोणते आमदार निवडून आले हे आपण मोबाईल वरून कसे चेक करायचे, व विधानसभा निवडणूक निकाल कसा पहायचा याबद्दल संपूर्ण माहिती पहा.
विधानसभा निवडणूक निकाल कसा पहायचा?
निवडणूक निकाल आपण मोबाईलApp मध्ये व निवडणूक निकाल वेबसाईट वरती सुद्धा पाहू शकता. मोबाईल अँप मध्ये निकाल पाहण्यासाठी प्ले-स्टोर वरून Voter Helpline हे अँप मोबाईल मध्ये Install करून घ्यावे. त्यानंतर ते अँप सुरु करा. खालील फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे तुम्हाला Election Result हा पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करा व त्यानंतर General Election to Assembly Constituencies या वरती क्लिक करावे.
Select Criteria (State/AC) या समोरील चिन्हावर क्लिक करून आपली विधानसभा निवडून घ्यावी. त्यानंतर तुम्हाला निकाल अपडेट झाल्यानंतर त्याठिकाणी पहायला मिळेल. Constituency Trends या ऑप्शन वरती क्लिक करा. त्यानंतर Leading वरती क्लिक करा.
निवडणूक निकाल पाहण्यासाठी दुसरा पर्याय
निवडणूक निकाल वेबसाईट वरती सुद्धा पाहता येणार आहे, https://results.eci.gov.in/index.html या वेबसाईट वरती निकाल पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी हि वेबसाईट ओपन करावी त्यानंतर AC General Elections या पर्याय वरती क्लिक करा.
निकाल अपडेट झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी निकाल पाहायला मिळेल. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.