2000 रु. हप्ता मिळाला नसेल तर काय करावे | PM kisan Yojana
PM Kisan Yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा बारावा हप्ता म्हणजेच २००० रु चा हप्ता १७ ऑक्टोंबर २०२२ ला शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग केला आहे, पाठविला आहे. “PM kisan Yojana”
परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना २००० रु. त्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. अशी चर्चा सुरु आहे. ज्या शेतकऱ्यांना हप्ता मिळाला नसेल त्यांना पुढील काही दिवसात हप्ता मिळेल. प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजने अंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यात २००० रु पाठविले आहेत.
आता शेतकऱ्यांनी कस ओळखायच खात्यात पैसे जमा झाले कि नाही? तसेच आपले आधार कार्ड कोणत्या बँकेत लिंक आहे हे तपासण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.(आपल्या गावाची जॉब कार्ड यादी पहा)
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना :
११ हप्ता (२००० रु) जमा झाला कि नाही हे पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.
- प्रथम आपण PM Kisan योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. अधिकृत संकेतस्थळ – https://pmkisan.gov.in/
- वरील संकेतस्थळावर तुम्हाला Beneficiary Status हा पर्याय निवडा म्हणजेच तुम्हाला तुमच्या अर्जाचे सद्यस्थिती/स्टेटस चेक करायचे आहे.
- मोबाईल नंबर, पीएम किसान खाते नोंदणी क्रमांक टाकून स्टेटस पाहू शकता.
- मोबाईल नंबर टाकून Captcha कोड भरून सर्च/Search वरती क्लिक करा. आपल्या समोर आपल्या अर्जाची सद्यस्थिती पाहायला मिळेल.(नवीन जॉब कार्ड कसे काढायचे पहा)
- यामुळे तुम्हाला Payment Mode हा पर्याय चेक करायचा आहे.
- म्हणजेच Payment Mode : Aadhar असेल, तर आपला २००० रु. हप्ता ज्या बँकेत आधार लिंक (NPCI) शी लिंक असेल त्याच बँकेत आपला २००० रु हप्ता जमा झालेला आहे.
- परंतु Payment Mode : Account असेल तर २००० रु हप्ता आपण दिलेल्या बँक खात्यावर जमा झालेला असेल.